अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार दिनांक २७ मे रोजी करजगांव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात घडलाय. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आलाय.
राहुरी तालूक्यातील करजगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील पाणिपुरवठा कर्मचारी सोमनाथ बापुसाहेब देठे हा दिनांक २७ मे रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात साफ सफाईचे काम करत होता. त्यावेळी आरोपी आण्णासाहेब काशिनाथ देठे राहणार करजगांव हा त्या ठिकाणी गेला.
आणि सोमनाथ देठे यास म्हणाला कि, अतिक्रमणा बाबत दिलेल्या नोटीसचे काय झाले. असे म्हणून फिर्यादी सोमनाथ देठे तसेच गावचे सरपंच शनीफ नजीर पठाण, संजय एकनाथ दिधे व इतर दोन ग्रामस्थ यांना कार्यालया बाहेर जाण्यास सांगून ग्रामपंचायत कार्यालयाला त्याने आणलेले कुलुप लावले.
यावेळी फिर्यादी सोमनाथ देठे त्यास म्हणाला की, हे सरकारी कार्यालय आहे. येथे कुलुप लावु नका. मला गावामध्ये पाणी सोडायचे आहे. चाव्या ऑफिसमध्ये आहेत.
असे म्हणल्याचा त्यास राग आल्याने त्याने फिर्यादी सोमनाथ देठे व ग्रामपंचायत हंगामी कर्मचारी अजय बाळासाहेब देठे यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. आणि ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप लावुन निघून गेला.
सोमनाथ बापुसाहेब देठे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आण्णासाहेब काशिनाथ देठे राहणार करजगाव ता. राहुरी.
याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मधुकर शिंदे हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम