7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर!कर्मचाऱ्यांच्या घरभाडेभत्त्यात देखील वाढ होण्याची शक्यता, वाचा घरभाडे भत्त्याचे सूत्र

Ajay Patil
Published:
emplyee

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढी संदर्भातल्या बातमी सोबतच एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना एक चांगली भेट मिळण्याची शक्यता असून सध्याच्या वाढलेल्या महागाईच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या घरभाड्या भत्त्यात देखील वाढ करण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी मार्चमध्ये झालेल्या महागाई भत्ता वाढीनंतर  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या घरभाडेभत्त्यात देखील वाढ मिळण्याची शक्यता आहे.

 लवकरच मिळू शकते चांगली बातमी

मिळालेल्या माहितीनुसार, एच आर ए म्हणजेच घर भाडेभत्ता साधारणपणे जुलै 2021 मध्ये अपडेट करण्यात आलेला होता. यावेळी महागाई भत्ता हा 25 टक्के करण्यात आला होता. परंतु आता महागाई भत्त्यात एका नवीन स्तरावर वाढ करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर घर भाडेभत्त्यात देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 सरकारी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने ठरवला जातो घरभाडे भत्ता

घर भाडे भत्ता हा संबंधित कर्मचारी कोणत्या शहरात राहतो यानुसार ठरवला जातो. घर भाडे भत्ता श्रेणीनुसार तीन भागांमध्ये विभागला असून ज्यामध्ये X,Y आणि Z अशा तीन श्रेण्या करण्यात आलेले आहेत. यापैकी सध्या झेड श्रेणीतील जे काही कर्मचारी आहेत त्यांना घर भाडे भत्ता हा त्यांच्या मूळ वेतनाच्या नऊ टक्के इतका आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेला घर भाडे भत्ता हा लवकरच तीन टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये श्रेणीनुसार विचार केला तर एक्स वर्ग शहरांमधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांना मिळणाऱ्या घर भाडेभत्त्या तीन टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे. तर वाय श्रेणीमध्ये असलेल्या शहरांमध्ये राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना दोन टक्के आणि झेड श्रेणीतील शहरांमध्ये हात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा घर भाडेभत्त्यामध्ये एक टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe