Caste Validity Certificate Arj : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा 12वीचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अर्थातच जात पडताळणी प्रमाणपत्र लागणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय प्रोसेस राहणार आहे, यासाठी अर्ज कसा करावा लागणार, अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र विद्यार्थ्यांना जोडावी लागणार आहेत? अर्ज सादर केल्यानंतर साधारणता किती दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे? याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शेअर मार्केट : ‘हा’ 15 रुपयाचा स्टॉक पोहचला 2 हजार रुपयांवर, गुंतवणूकदार बनलेत मालामाल
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा लागणार?
जर तुम्हाला हे कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट अर्थातच जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असेल तर आपण www.barti.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या अर्जाची कॉपी जात पडताळणी कार्यालयात जाऊन सादर करावी लागणार आहे. कार्यालयामध्ये अर्ज सादर झाल्यानंतर या अर्जाची छाननी कार्यालयात होईल. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मग संबंधित अर्जदार विद्यार्थ्याला जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार?
जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तेथील पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड जोडावे लागेल.
जात पडताळणी प्रमाणपत्र साठी केलेल्या अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो देखील जोडावां लागेल.
अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा आणि अर्जदाराचा जातीचा दाखला.
अर्जदाराच्या वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला पहिलेचा प्रवेश निर्गम उतारा आणि जातीचा दाखला लागणार आहे.
अर्जदाराचे वडील अशिक्षित असल्यास तसेच पत्र जोडावे लागेल.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्य कर्मचारी पुन्हा आंदोलन पुकारणार; आता काय आहे मागणी? वाचा
अर्जदार विद्यार्थ्यांच्या चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
अर्जदार विद्यार्थ्यांच्या आत्याचा शाळा सोडल्याचा दाखला.
अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला
इतर महसुली पुरावे जसे की, गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक इत्यादी पुरावे लागतील.
वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र) देखील यासोबत जोडावे लागणार आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र केव्हा मिळणार?
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर साधारणतः आठ ते दहा दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे जात पडताळणी समितीच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.
खरं पाहता, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जात पडताळणी समितीच्या माध्यमातून मात्र आठ ते दहा दिवसात संबंधित विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र पुरवण्याचा निर्णय झाला आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘त्या’ 37 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, राज्य शासनाचा जीआर जारी; केव्हा होणार गणवेश वाटप?