Dam In Maharashtra: पावसाळ्यात महाराष्ट्रातील या धरणांना भेट द्या! निसर्ग सौंदर्याचा मनमोहक आनंद घ्या

koyna dam

Dam In Maharashtra:  महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी भरलेली हिरवाई आणि या हिरवाईने नटलेले डोंगर दऱ्या पाहण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये फिरत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर मन मोहुन घेते.

याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठमोठी धरणे देखील असून पावसाच्या दिवसात या धरणांना भेट देणे हा एक मनाला भावणारा प्रसंग ठरू शकतो. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये छोटी मोठी धरणे आहेत. परंतु काही महत्त्वाची धरणे हे सिंचनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून महाराष्ट्राची शान आहेत. यापैकी काही महत्त्वाच्या धरणांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे धरणे

1- गंगापूर डॅम गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यात असून हे पहिले मातीचे धरण आहे. गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य खूप मोठ्या प्रमाणावर बहरून येते. नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये या धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Gangapur Dam's water level rises

2- भंडारदरा डॅम महाराष्ट्रातील हे एक प्रमुख धरण असून हे अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या अकोले तालुक्यात आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भंडारदरा धरण व या ठिकाणी असलेला रंधा धबधबा  पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. या ठिकाणी असलेले अनेक छोटे-मोठे धबधबे, डोंगरकडे तसेच धरणाचा समृद्ध जलाशय, या परिसरामध्ये असलेली हिरवीगार वनराई व थंड हवा त्यामुळे पर्यटना आनंद द्विगुणीत होतो.

Wilson Dam- Bhandardara Dam.JPG

3- जायकवाडी डॅम जायकवाडी धरण हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे. या धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर आहे.

आशिया खंडातील मोठे मातीचे धरण अशी याची ख्याती असून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासामध्ये या धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी वीज निर्मिती प्रकल्प असून  वीज निर्मितीत वापरले जाणारे पाणी पुन्हा धरणात लिफ्ट करण्याचा एकमेव प्रयोग या धरणाच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

Hydroelectric power station Itaipu Dam, Brazil, Paraguay Stock Image

4- भावली डॅम भावली डॅम हे मुंबई आग्रा महामार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या डॅम चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा जलाशय डोंगरांच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे याच्या सौंदर्यात आणखीच भर पडते. या धरणाच्या जलाशयाचे दिसणारे निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूला कोसळणारा धबधबा मन मोहून टाकतो. हे धरण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या गावाजवळ आहे.

Kashyapi Dam

5- कोयना डॅम हे धरण महाराष्ट्राची शान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते सातारा जिल्ह्यात असून कोयना नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचा जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो व त्याचा निसर्ग संपन्न परिसर मनाला भावून जाणार आहे.

या धरणाचा जो काही जलाशय आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला तापोळा नावाचे गाव असून या ठिकाणी कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम होतो. या ठिकाणी बोटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या परिसरामध्ये कोयना अभयारण्य देखील आहे.

Koyna Dam, Shivasagar Lake

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe