कुठे करता शेतकऱ्याचा नाद? ‘या’ शेतकऱ्याने थेट आणले इंग्लंडवरून ट्रॅक्टर! वाचाल किंमत तर व्हाल थक्क

Ajay Patil
Published:
farmer story

हौसेला मोल नसते असे वाक्य किंवा अशी म्हण आपण बऱ्याचदा ऐकली असेल व हे वाक्य किंवा म्हण अगदी खरी आहे हे आपल्याला बऱ्याच घटनांवरून दिसून येते. बऱ्याचदा आपण बातम्या वाचतो किंवा आपल्या ऐकण्यात येते की काही लाखांमध्ये शेतकरी म्हैस किंवा गाईची खरेदी करतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील नामपुर येथील शेतकऱ्याने चक्क पाच लाख रुपयापेक्षा अधिक किमतीत खिल्लारी बैल जोडी विकत घेतली व पूर्ण गावात मिरवणूक काढली.

अशा उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की हौसेपुढे पैशांची किंमत नसते. अगदी याच पद्धतीने जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर शेतीसाठी सर्वात उपयुक्त यंत्र म्हणून ट्रॅक्टर ओळखले जाते आणि शेतीची पूर्व मशागती पासून तर शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कालावधीत अनेक प्रकारच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो.

परंतु साधारणपणे आपल्याला ट्रॅक्टरची किंमत जर कोणी विचारली तर आपण सहजपणे म्हणतो पाच किंवा सात लाख किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये. परंतु जर ट्रॅक्टरची किंमत तुम्हाला एक कोटीच्या घरात सांगितली तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु आपल्याच भारतातील एका शेतकऱ्याने भारतातून नव्हे तर थेट इंग्लंड वरून ट्रॅक्टर आणले व या ट्रॅक्टरची किंमत ऐकली तर आपला विश्वास बसणार नाही इतकी आहे.

 बलबीर उर्फ बिरो नावाच्या शेतकऱ्याने आणले इंग्लंड वरून ट्रॅक्टर

याबाबत सविस्तर वृत्त असे की हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बलबीर उर्फ बिरो या शेतकऱ्याने भारतातून नव्हे तर चक्क इंग्लंडहून ट्रॅक्टर आणले आहे. या ट्रॅक्टरची किंमत जर आपण ऐकली किंवा वाचली तर आपले डोळे पांढरे होतील. ट्रॅक्टरची किंमत तब्बल एक कोटी दहा लाख रुपये इतकी आहे.

या इंग्लंड वरून आणलेल्या ट्रॅक्टरमध्ये एअर कंडिशनर्स असून त्याप्रमाणे महागड्या अशा एसयूव्ही कार मध्ये सनरूफ असते किंवा एसी असतो अगदी त्याच पद्धतीची सगळी टेक्नॉलॉजी या ट्रॅक्टरमध्ये वापरण्यात आलेली आहे. तसेच स्टबल मॅनेजमेंटच्या कामाला गती मिळावी याकरिता रशियाकडून एक कोटी सात लाख रुपये किमतीचे बेलर मशीन मागवण्यात आलेले होते व हे ट्रॅक्टर व बेलर चे सर्व नियंत्रण तुम्हाला या ट्रॅक्टरच्या कॅबिन मधून जे काही एलईडी डिस्प्ले लावण्यात आलेले आहेत

त्या माध्यमातून बसून पाहता येते. याविषयी एका मीडिया अशी बोलताना या शेतकऱ्याने सांगितले की हे ट्रॅक्टर त्यांनी कंपनीच्या कॉन्टर्ट थ्रू घेतले आहे होते व ते परालीच्या गाठी बनवून कंपनीला देणार आहे. पराली म्हणजेच पिकांचे उरलेले अवशेष व हे अवशेष जाळल्यामुळे प्रदूषणाची समस्या दिल्ली सारख्या शहराच्या अवतीभवती खूप मोठे उग्र स्वरूप धारण करते.

भारतामध्ये देखील अशा पद्धतीच्या मशीन होत्या परंतु त्या लहान होत्या त्या माध्यमातून कामाला खूप वेळ लागायचा. त्याच कामासाठी रशियाहून त्यांनी बेलर मशीन मागवली व ही मशीन एका दिवसाला शंभर एकरातील परालीच्या गाठी बनवण्याचे काम पूर्ण करते. परंतु एवढ्या मोठ्या क्षमतेचे मशीन चालवण्याकरिता दमदार आणि पावरफुल ट्रॅक्टरची गरज होती व म्हणूनच त्यांनी इंग्लंडहून एवढ्या किमतीचे ट्रॅक्टर मागवले आहे.

या परिसरामध्ये आता अनेक खाजगी क्षेत्रातील कंपन्या देखील पराली व्यवस्थापनामध्ये गुंतल्या असून शेतकऱ्यांच्या शेतातून परालीच्या ( पिकांचे उरलेले अवशेष) गाठी तयार करत आहेत व याचा फायदा आता कंपनी आणि शेतकरी यांना होताना दिसून येत आहे.

त्यामुळे आता पराली जाळायचे काम नाही व प्रदूषणापासून देखील मुक्तता मिळण्यास मदत झालेले आहे व शेतकऱ्यांची शेती देखील लवकर खाली होत असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. याच परलीच्या गाठी बनवण्यासाठी उपयुक्त असलेल्या बेलर मशीन करिता या शेतकऱ्याने इंग्लंड वरून हे महागडे ट्रॅक्टर मागवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe