दुधात भेसळ कशी केली जाते व त्यामध्ये कोणते घटक वापरतात? भेसळयुक्त दूध कसे ओळखावे? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
milk adultration

दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर पिण्यासाठी केला जातो. परंतु आपण जे दूध पितो हे खरोखर किती शुद्ध असते याचा आपण कधी विचार करतो का? दुधातील भेसळीचा मुद्दा हा खूप गंभीर मुद्दा असल्यामुळे त्याचा थेट आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.

शरीराला हानिकारक अशा अनेक घटकांची भेसळ दुधात केली जाते व ते दूध आपल्याला विकले जाते. त्यामुळे आपल्याला भेसळयुक्त दूध ओळखता येणे खूप गरजेचे आहे. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये दूध भेसळ संबंधी महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

दुधात कोणकोणत्या घटकांची भेसळ केली जाते?

त्यामध्ये पाण्याची भेसळ केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे आणि एक साधारणपणे सर्वसामान्य बाब समजली जाते. परंतु दुधाला सफेद आणि घट्ट बनवण्याकरिता साबण, डिटर्जंट पावडर आणि खूप असे हानिकारक केमिकल मिक्स केले जातात. बऱ्याचदा आपल्याला भेसळयुक्त दूध आणि शुद्ध दूध यामधील फरक ओळखता येणे कठीण जाते. आपल्याला बऱ्याचदा वाटते की पिशवी मधील दूध हे शुद्ध असते. परंतु बऱ्याचदा यामध्ये देखील सिंथेटिक स्वरूपाचे केमिकल मिसळले जाते.

काही लोक दुधात स्टार्च, डिटर्जंट मिसळून देतात. यामुळे दुधाचा दर्जा मोठ्या प्रमाणावर खालावतो. यामध्ये भेसळयुक्त दूध हे चांगल्या दुधात मिसळून विक्री करण्याचा धंदा सध्या जोरात आहे. हे भेसळीत दुधामध्ये शाम्पू, ग्लुकोज, फॅब्रिक कलर मिक्स केला जातो. त्यामुळे हे दूध एकदम शुद्ध दुधासारखे दिसते.  हे दूध असे असते की लॅक्टोमीटर च्या साह्याने सुद्धा ओळखता येणे कठीण जाते. असे भेसळीयुक्त दूध पिल्यामुळे कॅन्सर, हृदयरोग, त्वचेचे अनेक रोग होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर हाडे देखील कमजोर होण्याची शक्यता असते.

भेसळुक्त दूध बनवण्यासाठी त्यामध्ये लिक्विडयुक्त वाशिंग फॅब्रिक्स मिसळले जातात. यामुळे दुधाची मात्रा वाढते. नंतर त्यामध्ये रिफाइंड तेल मिसळले जाते व यामुळे दुधाला चिकटपणा येतो. त्यानंतर त्या दुधाला अर्ध्या तासापर्यंत व्यवस्थित मिक्स केले जाते. त्यानंतर या सिंथेटिक दुधामध्ये पाणी मिक्स केले जाते. अशा पद्धतीने हे सिंथेटिक म्हणजेच भेसळयुक्त दूध तयार केले जाते. हेच दूध शहरांमध्ये वितरित केले जाते व यापासूनच बऱ्याच ठिकाणी मिठाई वगैरे बनवल्या जातात.

दुधात भेसळ करण्यासाठी अनेक मार्गांचा वापर केला जातो. त्यातील पहिला म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये शाम्पू टाकला जातो व त्यामध्ये अर्धा लिटर रिफाईंड ऑइल टाकले जाते व त्यामध्ये अर्धा लिटर शुद्ध दूध टाकले जाते. दुधाला घट्टपणा यावा याकरिता साखरेची पावडर आणि त्यामध्ये अर्धी बादली पाणी टाकले जाते. अशापद्धतीने भेसळयुक्त दूध तयार होते. अशा अनेक पद्धती वापरून भेसळयुक्त दूध तयार केले जाते.

 अशापद्धतीने ओळखा दुधामध्ये भेसळ?

1- दूध बोटांवर घासणे-सिंथेटिक दूध निर्मिती करताना प्रामुख्याने साबण वापरला जातो. त्यामुळे भेसळीत दुधाला साबणाचा वास येतो व हे दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासले असता त्यामधून फेस तयार होतो. हा प्रयोग करून पाहिला तरी दूध भेसळयुक्त आहे असे आपल्याला कळते.

2- जमिनीवर टाकून तपासण्याची पद्धत बनावट दुधाची तपासणी करण्यासाठी दुधाचे काही थेंब चिकट किंवा पॉलिश केलेल्या फरशीवर टाका. दूध जर शुद्ध असेल तर त्याचे थेंब  ओघळतात व मागे डाग राहतात. परंतु दूध जर भेसळयुक्त असेल तर त्याचे काहीच डाग राहत नाहीत.

3- खवा करून पाहणे दुधाची शुद्धता तपासायचे असेल तर त्यापासून खवा तयार करून पहावा. त्यासाठी दूध दोन ते तीन तास मंद आचेवर उकळून घ्यावे. हे करताना ते दूध ढवळत राहावे. नैसर्गिक दुधाचा खवा एकदम मऊसर बनतो तर भेसळयुक्त दुधाचा खवा कडक बनतो.

4- लिटमस टेस्ट दुधातील भेसळ ओळखण्याकरिता एक रासायनिक चाचणी देखील करता येते. यामध्ये सिंथेटिक दुधाला नैसर्गिक दुधासारखे चव यावी म्हणून युरिया मिसळला जातो. हे ओळखण्याकरिता अर्धा चमचा दुधात सोयाबीन पावडर मिसळा व या मिश्रणात लिटमस पेपर घाला. या पेपरचा रंग लाल किंवा निळा झाला तर दुधात भेसळ आहे हे लक्षात घ्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe