Health Tips: दररोज 15000 पावले चालल्याने तुमचे आयुर्मान वाढेल? मिळतील ‘हे’ 10 फायदे व आरोग्य राहील ठणठणीत

Ajay Patil
Published:
health tips

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता आणि निरोगी आयुष्यकरिता ज्याप्रमाणे संतुलित आहाराची गरज आहे.अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला व्यायामाचे देखील गरज असते. व्यायामामध्ये बरेच व्यक्ती सकाळ आणि संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करतात. आपण बऱ्याचदा सकाळी रस्त्यांवर अनेक लोक चालताना बघतो.

कारण दररोज चालणे हा एक फायदेशीर व्यायाम असून शरीराच्या तंदुरुस्ती आणि चांगल्या आरोग्या करिता खूप महत्त्वाचा आहे. बरेच व्यक्ती हा साधा सोपा व्यायाम त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करून घेतात. चालण्यामुळे हृदय निरोगी राहतेस परंतु वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. दिवसाचा मूड चांगला राहतो तसेच ताजतवाने व तंदुरुस्त वाटते. जर तुम्ही दररोज 15000 पावले चालले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात व त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

 दररोज 15000 पावले चाललात तर मिळतील हे फायदे

1- हृदयाचे आरोग्य चांगले राहते जर तुम्ही दररोज चाललात तर त्याचा हृदयाला अनेक फायदे मिळतात. हृदय मजबूत राहते तसेच रक्तदाब कमी होतो आणि रक्ताभिसरण क्रिया देखील सुधारते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमीत कमी होतो.

2- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त दररोज चालण्याने कॅलरीज बर्न होतात व याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो किंवा आहे ते वजन टिकून ठेवण्यात देखील मदत होते. वजन जर नियंत्रणात असेल तर लठ्ठपणा संबंधित जे काही रोग होण्याचा धोका असतो तो कमी होतो.

3- श्वसनाचे आरोग्य जर तुम्ही नियमितपणे चालण्याचा व्यायाम करत असाल तर तुमच्या फुफ्फुसांची क्षमता सुधारते व त्यांच्या कार्यप्रणाली मध्ये देखील सुधारणा होते व त्यामुळे श्वसनाचे आरोग्य उत्तम राहते व दीर्घायुष्य मिळू शकते.

4- स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी चालण्यांमध्ये शरीराचे वजन उचलणे समाविष्ट असल्यामुळे हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. यामुळे हाडांची घनता आणि स्नायूंची ताकद मेंटेन म्हणजेच राखली जाते व यामुळे ऑस्टोपोरायसिसचा धोका राहत नाही आणि वृद्धापकाळात  अशक्तपणा कमीत कमी होतो.

5- मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरामध्ये एन्डोर्फीन नावाची रसायने बाहेर पडतात व यामुळे मानसिक तणाव तसेच चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. नेहमी चाललात तर मेंदूची कार्यक्षमता सुधारते व मेंदू तीक्ष्ण होतो व स्मृतिभ्रंशाचा धोका देखील कमी होतो.

6- ऊर्जेच्या पातळीत होते वाढ चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह देखील सुधारतो व शरीरामध्ये ऊर्जेची पातळी राखली जाते व अधिक निरोगी वाटायला लागते व कामांमध्ये सक्रियता देखील वाढते.

7- मजबूत प्रतिकारशक्ती दररोज हलकासा व्यायाम करण्यामुळे म्हणजे चालण्यामुळे शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते व त्यामुळे संक्रमण तसेच रोगांचा धोका कमीत कमी होतो.

8- झोपेत होते सुधारणा नियमितपणे शारीरिक हालचाली केल्यामुळे चांगली व शांत झोप लागते व शांत झोप लागणे हे चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

9- जुनाट आजारांचा धोका कमी नियमितपणे चालण्याचा व्यायाम केल्यावर टाईप 2 मधुमेह, मेटाबोलिक सिंड्रोम आणि काही कॅन्सर सारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका देखील कमीत कमी होतो.

10- दीर्घ स्वरूपाचे आयुर्मान याविषयी करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये दिसून आले आहे की, चालणे व यासोबत काही नियमितपणे शारीरिक हालचाली केल्यामुळे दीर्घायुष्य वाढते. तसेच पंधरा हजार पावले दररोज चालण्यामुळे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते व अकाली येणाऱ्या मृत्यूचा धोका कमीत कमी होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe