Health Tips:- शरीराच्या सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहाराची नितांत आवश्यकता असते हे आपल्याला माहिती आहे. आहारामध्ये तुम्ही जितका संतुलित आहाराचा समावेश कराल तितके शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता ते महत्त्वाचे आहे. परंतु जर आपण शरीराचा विचार केला तर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा कळत नकळत विपरीत परिणाम देखील आपल्यावर होताना दिसून येतो.
जर आपण सध्याचे जीवनमान पाहिले तर ते अत्यंत धकाधकीचे धावपळीच्या झाल्यामुळे जेवणाच्या सवयी पासून ते एकंदरीत दैनंदिन रुटीनमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे व याचा नक्कीच वाईट परिणाम हा आरोग्यावर होताना दिसून येतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत याचा देखील खूप मोठा परिणाम हा शरीरावर होत असतो.
त्यामुळे जेवताना ते किती आणि कसे व कधी खावे याबाबत देखील काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. याबद्दल सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी काही महत्त्वाच्या टीप्स सांगितलेल्या असून ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
जेवताना किती, कधी व कसे खावे?
1- दररोज दोन वेळा जेवण करावे- जर आपण जगभरात प्रसिद्ध असलेल्या OMAD डायटचा विचार केला तर त्यानुसार दिवसभरामध्ये फक्त एकदाच खावे असा सल्ला देण्यात आलेला आहे व ही वजन कमी करण्यासाठी एक चांगली पद्धत असल्याचे मानले जाते. परंतु दिवसभरात जर दोन वेळेस जेवण केले तर गंभीर आजारांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. यामध्ये साधारणपणे सकाळी दहा वाजता पहिले जेवण आणि दुसरे सात वाजता असणे गरजेचे आहे.
2- हाताने जेवण करण्याला प्राधान्य द्यावे- आता बऱ्याच गोष्टींमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्याकडे दिसून येतो व तसा तो जेवणाच्या पद्धतीवर देखील दिसतो. कारण आता बरेच जण काटा चमच्याने खायला पसंती देतात. परंतु या बाबतीत सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मते जेवणाला जोपर्यंत तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत जेवण काय आहे ते आपल्याला कळत नाही. याकरिता काटा चमचाने न खाता ते हाताने खाल्लेले अधिक फायदेशीर ठरतं. त्यामुळे जेवणाच्या अगोदर पाण्याने व साबणाने हात स्वच्छ धुऊन मगच जेवायला बसावे.
3- जेवल्यानंतर आभार मानणे- जेवताना आपण आभार मानणे विसरतो. कारण सद्गुरु जग्गी वासुदेव याबाबतीत म्हणतात की आपल्या ताटामध्ये जे काही भाज्या, अन्न येते ते कोणत्या पद्धतीने आपल्या ताटात आली आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण जे काही झाड, फुलं इत्यादी खातो ते सजीव असतात व त्यांच्याकडून मिळालेल्या अन्न हे आपण खाताना त्यांचे धन्यवाद करायला विसरू नये.
4- अन्न व्यवस्थित चावूनच खावे- जेवण करताना ते अधाशासारखे न खाता ते नेहमी व्यवस्थित चावून खाणे गरजेचे आहे. जेवणाची 24 भाग करून ते 24 वेळा अन्न चावून खाणे गरजेचे आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार पाहिले तर अन्न व्यवस्थित चावून खाल्ले तर शरीराला चांगले पोषण मिळते.
5- जेवण करताना ते किती व काय खाता याकडे लक्ष द्यावे- अनेकदा ताण तणावांमध्ये किंवा घाई गडबडीत जास्त खाल्ले जाते किंवा कोणता पदार्थ खातो याकडे आपण लक्ष देत नाही. वेळेवर जेवण करणं फार महत्त्वाचे असते. जर तुम्ही माईंडफुल इटिंग म्हणजेच व्यवस्थित मन लावून जेवण केले तर त्याचा परिणाम हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास होतो व शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहणे हे दररोजच्या कामकाजासाठी खूप आवश्यक असते.
अशा पद्धतीने सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी जेवणाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत.