निरोगी शरीर, निरोगी आयुष्यासाठी अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते व या पोषक घटकांची पूर्तता ही आपल्याला संतुलित आहाराच्या माध्यमातून केली जाते. संतुलित आहारामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फळे व दुग्धजन्य पदार्थांसोबत मांसाहारी पदार्थांचा देखील समावेश होतो.
या व्यतिरिक्त असे अनेक खाद्यपदार्थ असतात की ते देखील शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात.अशा पदार्थांमध्ये जर आपण कांद्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतीय आहारातील हा एक प्रमुख पदार्थ असून स्वयंपाक घरातील खाद्यपदार्थ देखील कांद्याशिवाय पूर्ण होत नाही हे तेवढेच सत्य आहे.
कांदा हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप फायदेशीर असून अनेक भाज्यांमध्ये तसेच पराठे व सॅलडच्या स्वरूपामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. परंतु असे बरेच लोक आहेत की त्यांना कांदा खाणे आवडत नाही किंवा काही कारणांमुळे ते आहारात कांद्याचा समावेश करत नाही. अशा प्रकारे जर कांदा खाल्ला नाही तर शरीरामध्ये काय बदल होतात? त्याबद्दलची माहिती या लेखात बघू.
तीस दिवस जर कांदा खाल्ला नाही तर काय होते?
समजा एक महिना म्हणजेच तीस दिवसापर्यंत जर एखाद्या व्यक्तीने कांदा खाल्ला नाहीतर त्याच्या शरीरावर काही परिणाम होण्याची शक्यता असते. कारण कांद्यामध्ये फायबर असतात व ते पोट साफ ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात व पचनक्रिया चांगली राहते.
कांद्याचे सेवन अनेक दिवसांपर्यंत केले नाही तर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते व इन्फ्लॅमेटरी पावर देखील कमी होते. तसेच कांद्यामध्ये सूज विरोधी गुणधर्म असतात व त्यामुळे कांदा खाल्ला नाही तर शरीरात सूज येऊ शकते. तसेच कांद्याचे सेवन केले नाही तर ऑक्सीडेटिव्ह ताण येतो.
आरोग्य तज्ञांच्या मते उन्हाळ्यामध्ये अशा लोकांना अनेक आजारांचा धोका उद्भवतो. कच्चा कांद्याचे सेवन केले तर आरोग्य देखील चांगले राहते. कांदा खाल्ल्यामुळे उष्माघातासारख्या समस्या देखील उद्भवत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आहारात कांद्याचा समावेश केला तर शरीराला थंडावा मिळतो व शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
कांद्यामध्ये असलेले पोषक घटक व आरोग्याला होणारा फायदा
कांद्यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स व अँटिऑक्सिडंट तसेच पोषक तत्व असल्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व अनेक आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरतात. कांद्यात असलेले फायबर हे पचनशक्ती चांगले ठेवते त्यासोबत मेटाबोलिझम देखील वाढण्यास मदत होते.
तसेच कांद्यामध्ये असलेले विटामिन बी सहा आणि फोलेटमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कांद्यामध्ये एलील प्रोफाइल डायसल्फाईड नावाचे अँटिऑक्सिडंट असते व त्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासून देखील बचाव होतो. या सगळ्या गुणधर्मामुळे कांद्याचे सेवन हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते.