थायरॉईड म्हणजे नक्की काय असते? का निर्माण होते थायरॉईडची समस्या व काय असतात लक्षणे? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
thyroid

मानवी शरीरामध्ये अनेक छोट्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण मानवी शरीरा असंख्य पेशींनी बनलेले आहे व यामध्ये ग्रंथींची संख्या देखील मोठी आहे व यामध्ये देखील अनेकदा काही आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात व व्यक्तीला हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागतात.

याच प्रकारे जर आपण घशामधील एक ग्रंथी पाहिली तर तिचे नाव थायरॉइड असे आहे व या ग्रंथीच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या संप्रेरकांचा स्त्राव होतो व ही संप्रेरके आपल्या शरीरातील स्नायू तसेच हृदय आणि मेंदू यांचे काम विना अडचण आणि चांगले चालण्यासाठी मदत करत असतात. परंतु बऱ्याच व्यक्तींना थायरॉईडची समस्या निर्माण होते. त्यामुळे या लेखात आपण नेमकी थायरॉईड ही समस्या काय असते व नेमकी लक्षणे काय असतात? याबद्दलची माहिती घेऊ.

 थायरॉईडची समस्याचे किती प्रकार असतात?

थायरॉईडच्या समस्येचे प्रामुख्याने तीन प्रकार येतात व त्यातील महत्त्वाचे म्हणजे हायपोथायरॉईड, हायपर थायरॉईड आणि गलगंड हे होय. परंतु या तीन प्रकारांपैकी हायपोथायरॉईड आणि हायपर थायरॉईड या समस्यांचा त्रास जास्त होतो.यातील

 हायपो थायरॉईड या प्रकारामध्ये थायरॉईड ग्रंथी मधून होणारा संप्रेरकांचा स्त्राव हा आवश्यकतेपेक्षा कमी होतो व यामुळे वजन वाढणे तसेच भूक मंदावणे, शरीर स्वस्त वाटणे व केस गळणे इत्यादी समस्या जाणवायला लागतात व स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे व गर्भधारणेत अडचणी इत्यादी समस्या उद्भवतात.

 हायपर थायरॉईड या प्रकारामध्ये थायरॉईड ग्रंथी मधील जे काही संप्रेरके  असतात त्यांचा स्त्राव आवश्यकतेपेक्षा जास्त होतात व त्यामुळे आहार जरी संतुलित असला तरी वजन कमी होते. तसेच चिडचिड वाढायला लागते व स्वभावातील चिंतातुरता देखील वाढते व उष्णतेचा त्रास व्हायला लागतो. तसेच स्वभावामध्ये देखील सतत चढउतार व्हायला लागतात.

 गलगंड या प्रकारामध्ये थायरॉईडच्या ग्रंथीला सूज येते व हा त्रास औषधांमुळे बरा होऊ शकतो. परंतु समस्या जास्त प्रमाणात असेल तर मात्र ऑपरेशन करावे लागते.

 थायरॉईडचा त्रास होण्यामागील प्रमुख कारणे

1- कॅफीनचे सेवन जास्त प्रमाणात केले तर

2- महिला वर्गाला प्रसूतीनंतर थायरॉइडचा त्रास होऊ शकतो.पण तो औषधांनी बरा होतो.

3- स्वयंप्रतिरोधक रोगामुळे शरीरातील थायरॉईडचे प्रमाण कमी जास्त होते.

4- दुसऱ्या काही आजाराची औषधे चालू असतील तर त्यामुळे देखील थायरॉईडचे प्रमाणात बदल होऊ शकतो.

 थायरॉइडमध्ये कोणते मुख्य घटक असतात?

थायरॉईडचे मुख्यतः टी थ्री, टी फोर आणि टी एस एस हे तीन घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने…

1- टी-थ्री, टी-फोर शरीरातील प्रमाण वाढले तर टी एस एसचे प्रमाण कमी होते.

2- टी-थ्री, टी-फोरचे शरीरातील प्रमाण घटले तर टी एस एसचे प्रमाण वाढते.

3- त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टी एस एसचे शरीरामध्ये प्रमाण 0.4-4.0miu/L यामध्ये हवे. परंतु लहान मुली आणि गरोदर महिलांमध्ये हे प्रमाण वेगळे असते.

 थायरॉईड हा आजार बरा होऊ शकतो का?

थायरॉईडची समस्या उद्धवली तर ती औषधे घेऊन बरी होऊ शकते. या औषधांच्या माध्यमातून 80 ते 90 टक्के रुग्ण बरे होतात व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थायरॉईडमुळे मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे. परंतु थायरॉईडच्या हायपर थायरॉईड या प्रकारामुळे हृदयाचे ठोके कमी होतात

व त्यामुळे हार्ट अटॅकमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो किंवा मेंदूवर परिणाम होऊन काही त्रास होण्याची शक्यता असते. औषधे घेतल्यावर थायरॉईड चांगला झाल्यानंतर तुम्ही योग्य आहार आणि नियमित व्यायाम केला तर त्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe