तुम्ही आहारामध्ये तुपाचा वापर करतात ते भेसळयुक्त तर नाही ना? ओळखायचं असेल तर वापरा ‘या’ 4 टिप्स आणि टाळा धोका

Ajay Patil
Published:
adultration in ghee

आहारामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. उत्तम आरोग्याकरिता चांगला आणि संतुलित आहार घेणे तितकेच गरजेचे असते. परंतु आपण जो आहार घेतो तो  रसायनमुक्त असणे खूप गरजेचे असते. कारण आहारामध्ये समावेश करण्यात आलेल्या घटकांमध्ये जर काही गोष्टींची भेसळ असेल किंवा भेसळयुक्त आहार असेल तर त्याचा फायदा होण्याऐवजी आरोग्याला ते घातक असते.

आपल्याला सध्या माहित आहे की बऱ्याच गोष्टींमध्ये भेसळ केली जाते. भेसळीचे उत्तम उदाहरण म्हणजे दूध हे होय. भेसळयुक्त दूध हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे आणि त्यासोबतच आपण आता बऱ्याच बातम्या किंवा ऐकले असेल की पनीर किंवा इतर तत्सम दुग्धपदार्थ देखील भेसळयुक्त बनवणारे कारखान्यांचा देखील पर्दापाश करण्यात आला.

त्यामुळे आपण अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करण्याअगोदर त्यांची शुद्धता तपासून घेणे खूप गरजेचे असते. या अनुषंगाने आपण तुपाचा विचार केला तर तूप देखील मोठ्या प्रमाणावर आहारात वापरले जाते. परंतु तुपामध्ये देखील भेसळ केलेली असू शकते व ते कसे ओळखावे हे देखील आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण तुपाच्या अनुषंगाने त्याची शुद्धता कशी तपासावी याबद्दल महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत.

 तुपातील भेसळ कशी ओळखावी?

तूप जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ते आपण एखाद्या दुकानातून घेतो व ते एखाद्या चांगल्या ब्रँडचे पॅकबंद डब्यामध्ये मिळते. परंतु आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये बऱ्याच  वेळा कुठलेही पॅकबंद नसलेले सुटे तूप देखील विकले जाते. बऱ्याचदा हे तूप घरी तयार केलेले आहे अशा पद्धतीची बतावणी केली जाते.

परंतु खरंच हे तूप शुद्ध असते का हे देखील पाहने तितकेच गरजेचे आहे. याकरिता तुम्ही घरगुती काही गोष्टी वापरून तुपाची शुद्धता ओळखू शकतात. या शुद्धतेच्या कसोटीवर जर तूप खरे उतरले तरच तुम्ही ते खरेदी करू शकतात व यासंबंधीची एक महत्त्वाची माहिती व शुद्धता ओळखण्याच्या टिप्स इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या एका पेजवर शेअर करण्यात आलेली आहे. तुपाची शुद्धता ओळखण्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्ही…..

1- एका वाटीमध्ये पाणी घ्यावे व त्यामध्ये एक टीस्पून तूप टाकावे. जर या वाटीतील पाण्यात तूप टाकल्यानंतर तूप वाटीच्या तळाशी गेले तर ते तूप भेसळयुक्त आहे असे समजावे.

2- तसेच दुसरी पद्धत म्हणजे एका वाटीमध्ये वितळलेले व कोमट झालेले तूप घ्यावे व त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकावे. मीठ टाकल्यानंतर जर तुपाचा रंग बदलला तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे.

3- तसेच तिसरी पद्धत म्हणजे एका वाटीमध्ये वितळलेले व कोमट झालेले तूप घ्यावे व त्यामध्ये अर्धा टीस्पून पिठीसाखर टाकावी. हे केल्याने जर तुपाचा रंग बदलला नाही तर ते शुद्ध तूप आहे असे समजावे.

4- तसेच वितळलेले तूप एका काचेच्या वाटीमध्ये भरावे व ती वाटी एक तास फ्रिजरमध्ये ठेवून द्यावी. त्यानंतर काही वेळाने ती बाहेर काढावी व तूप जर एकसंध न दिसता त्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे थर दिसायला लागले तर ते तूप भेसळीचे आहे असे समजावे.

 अशा पद्धतीने तुम्ही या चार टिप्स वापरून अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी तुपाची शुद्धता ओळखू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe