Water Drink Tips: तुम्ही देखील पाणी पिता परंतु कसे? तुम्हाला माहित आहे का पाणी पिण्याची योग्य पद्धत? वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
proper ways drinking water

Water Drink Tips:- आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर अनेक छोट्या मोठ्या आपल्या दैनंदिन सवयींचा चांगला किंवा वाईट परिणाम हा आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे असते.

त्यामध्ये तुमच्या झोपण्याच्या वेळेपासून तर जेवणाच्या वेळा इत्यादींना देखील खूप महत्त्व असते. या पद्धतीने जर आपण पाणी पिण्याच्या सवयी बद्दल विचार केले तर यामध्ये देखील काही महत्त्वाच्या आणि योग्य पद्धत असून त्या तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

आता पाण्याचा विचार केला तर पाण्याला जीवन म्हटले जाते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उत्तम आरोग्य करिता पुरेशा प्रमाणात दिवसातून पाणी पिणे खूप गरजेचे असते व कमीत कमी दोन ते चार लिटर पाणी पिणे खूप आवश्यक असते. परंतु पाणी पिताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणे गरजेचे असते. नेमके पाणी पिण्याचे योग्य पद्धती कोणत्या याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.

 पाणी पिण्याच्या योग्य पद्धती कोणत्या?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठतात तेव्हा उठल्यानंतर दोन ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. याबाबत आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदाच्या मते सकाळी काहीही खाण्यापूर्वी पाणी पिण्याचे अनेक प्रकारचे फायदे होतात.

त्यातील पहिला म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते व शरीराची सफाई देखील चांगली होते. असेच तुम्ही सकाळी उठल्यानंतर अनशापोटी पाणी पिले तर पोट दुखण्यापासून देखील आराम मिळतो.

तसेच बरेच जणांना जेवण करताना पाणी पिण्याची सवय असते किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी प्यायला लागते. परंतु तसं न करता जर तुम्ही जेवण झाल्यावर साधारणपणे 30 मिनिटे आधी पाणी प्यावे. यामुळे अन्न सहजपणे पचते व जेवण करताना आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये.

जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी पिले तर ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी पिल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच एक्सरसाइज केल्यामुळे जर पाणी पिले तर डीहायड्रेशन ची समस्या देखील राहत नाही.

 पाणी पिताना या गोष्टी टाळाव्यात

आयुर्वेदानुसार पाणी पिताना ते शांतपणे खाली बसून प्यावे. उभे राहून कधीही गटागटा पाणी पिऊ नये. असे केल्यामुळे पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जाते व त्यामुळे पोषक तत्त्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे पाणी गटागटा न पिता एक एक घोट करत हळूहळू प्यावे. असे केल्यामुळे पाण्यासोबत आपली लाळ देखील पोटात जाते व पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते.

 दिवसातून किती पाणी प्यावे?

असे मानले जाते की दिवसांमधून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. अशामुळे भरपूर पाणी पिले तर शरीराचं मेटाबोलिझम चांगले राहते तसेच पचनक्रिया देखील योग्य पद्धतीने होते. पाणी योग्य प्रमाणात पीत राहिल्याने शरीरात फॅट जमा होत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe