Laxmi-Narayan Yog:- येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आता नवीन वर्षाची सुरुवात होणार असून सर्वांनाच या नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता लागून राहिलेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणार असून यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग देखील तयार होणार आहेत.
या सर्व ज्योतिष शास्त्रीय परिस्थितीचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा त्या राशींच्या व्यक्तींना या नवीन वर्षात अनुभवायला मिळणार आहे. अगदी याच पद्धतीने बुध ग्रहाने वक्री होऊन 28 डिसेंबरला सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे या वृश्चिक राशीमध्ये अगोदरच शुक्र विराजमान असल्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होऊन आता शुभ असा लक्ष्मीनारायण योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना या लक्ष्मीनारायण योगाचा खूप मोठा फायदा होणार असून अचानकपणे यश व धनसंपदा प्राप्त होणार आहे. तयार होणाऱ्या या लक्ष्मीनारायण योगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल किंवा कोणत्या राशींचे नशीब पालटणार आहे याबद्दलची माहिती घेऊ.
लक्ष्मीनारायण योगामुळे या राशींचे नशीब बदलणार
1- धनु(Sagittarius)- तयार होत असलेल्या या लक्ष्मीनारायण योगामुळे धनु राशींच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवणे सुलभ होणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता असून कुटुंबामध्ये देखील सुख आणि शांती नांदू शकणार आहे. लक्ष्मी नारायण राज योगामुळे करियर आणि व्यवसायात देखील प्रगती होण्याची शक्यता आहे.
या व्यक्तींचे काही अडकलेले पैसे असतील तर ते देखील परत मिळणार आहेत. धनु राशींच्या व्यक्तींना चांगला नफा मिळण्याची शक्यता असून बँक बॅलन्स देखील वाढणार आहे.
2- वृश्चिक(Scorpio)- लक्ष्मीनारायण योगामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे तसेच नोकरी आणि व्यवसायात देखील मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर खूप मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक फायद्याच्या संधी देखील या काळात मिळणार आहेत. नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाण्याची संधी देखील मिळणार असून अशा व्यक्तींना कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून आर्थिक लाभ मिळू शकणार आहे.
3- मिथुन(Gemini)- लक्ष्मीनारायण योगामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना खूप सुख येण्याची शक्यता आहेच. परंतु अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे.
या कालावधीत वाहन आणि मालमत्ता मिळण्याची शक्यता असून नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप भाग्याचा सिद्ध होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या कालावधीत चांगले यश मिळू शकणार आहे. मिथुन राशीचे जे व्यक्ती अविवाहित असतील त्यांचा करिता विवाहाचा प्रस्ताव येण्याची देखील शक्यता आहे.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही काम करत आहोत. यासंबंधी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)