Numerology:- ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राला भारतीय परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे. अगदी त्याप्रमाणेच महत्त्व हे अंकशास्त्राला देखील आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह तसेच जन्मतारीख व जन्मवेळ इत्यादी गोष्टींवरुन व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते किंवा त्यावर्षीचा अंदाज वर्तवला जातो.
तर अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ज्या तारखेला झालेला असतो त्या जन्मतारखेवरून निघणाऱ्या मुलांकावरून त्या व्यक्तीचे आयुष्य कसे असू शकते किंवा त्याचे व्यक्तिमत्व कसे असते? स्वभाव कसा असतो? इत्यादी बद्दलची माहिती आपल्याला मिळते.
अंकशास्त्रानुसार बघितले तर कोणत्याही महिन्याच्या 3,12,21 आणि तीस तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्यांचा मूलांक तीन असतो. अंकशास्त्रानुसार बघितले तर तीन मुलांक असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरु असतो व गुरुला सर्व ग्रहांचा स्वामी ग्रह मानले जाते.या सगळ्या अनुषंगाने तीन मुलांक असलेले म्हणजेच वर दिलेल्या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो ते लोक कसे असतात हे अंकशास्त्रात सांगितले आहे.
अंकशास्त्रानुसार तीन मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?
अंकशास्त्रानुसार बघितले तर ज्या लोकांचा मुलांक तीन असतो असे व्यक्ती हे खूप स्वाभिमानी असतात व ते कधीच कुणासमोर झुकत नाहीत व त्यांना झुकायला आवडत देखील नाही.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते अभ्यासामध्ये देखील खूप हुशार असतात व विज्ञान आणि साहित्य मध्ये त्यांना विशेष आवड असते. त्यांना खूप शांततेत जीवन जगायला आवडते व गर्दीच्या ठिकाणी त्यांना मुळीच आवडत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये उगीचच इतरांनी दखल देणे ते सहन करून घेत नाहीत व त्यांना मनाप्रमाणे जगायला आवडते.
ते लोक असतात प्रचंड मेहनती आणि धाडसी
तसेच तीन मुलांक असलेले व्यक्ती आयुष्यामध्ये खूप मेहनत घेतात व ते धाडसी देखील असतात. कुठलेही काम करताना ते अगदी मन लावून करतात व यशस्वी होतात.
एकदा का त्यांनी एखादे काम पूर्ण करण्याचे ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाहीत. त्यामध्ये त्यांना रुची असते व विज्ञानाची देखील त्यांना खूप आवड असते व त्यामुळे त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मात्र आवडत नाही.
तीन मुलांक असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती मात्र चांगली राहत नाही
तीन मुलांक असलेल्या व्यक्तींची आर्थिक स्थिती बघितली तर ती तितकीशी चांगली नसते. आयुष्यात त्यांना कायमच पैशांची कमतरता भासत असते.
कायम पैशांच्या चणचणीचा सामना करावा लागतो. परंतु या लोकांना आयुष्यामध्ये पैसा मिळतो. परंतु तो उशिरा मिळतो. हे लोक चटकन कोणावरही विश्वास ठेवतात व त्यामुळे जवळचे लोक देखील त्यांचा विश्वासघात करायला मागे पुढे पाहत नाहीत.
( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा त्याचा दावा करत नाही.)