Horoscope:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर शनि सध्याच्या मूळ त्रिकोण राशी म्हणजेच कुंभ राशीमध्ये असून 15 नोव्हेंबर पर्यंत तो वक्री असणार आहे व पुढच्या 28 मार्च 2025 पर्यंत याच राशीत स्थित असणार असून त्यानंतर मात्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर हा 153 दिवसांचा कालावधी काही राशींसाठी खूप फायद्याचा आणि भाग्यशाली असा राहणार आहे. शनी म्हटले म्हणजे न्यायाची आणि कर्मानुसार फळ देणारी देवता म्हणून ओळखली जाते. त्यामुळे असे मानले जाते की जो व्यक्ती चांगले कर्म करतो त्याच्यावर शनि देवाची कृपा असते.
शनिच्या या स्थितीचा फायदा नेमक्या कोणत्या राशींना होणार आहे? त्या कोणत्या भाग्यवान राशी आहेत? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
शनीची कृपा या राशींसाठी ठरेल फलदायी
1- तूळ– सध्या शनी कुंभ राशीमध्ये असून त्याची या राशीतील उपस्थिती तुळ राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 153 दिवसांचा हा कालावधी तुळ राशींच्या व्यक्तींकरिता खूप अनुकूल असणार असून या कालावधीमध्ये आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे व उत्पन्नाचे देखील अनेक मार्ग मिळणार आहेत.
जे व्यक्ती नोकरी करतात त्यांच्या कामामध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. प्रेम संबंध देखील सुखमय राहतील व या कालावधीत तुमच्यात साहस निर्माण होईल. तसेच ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी खूप कौतुक केले जाईल व मानसन्मान देखील मिळेल.
2- मिथुन– शनि देवाची कुंभ राशीतील ही स्थिती मिथुन राशींच्या व्यक्तींकरिता देखील खूप फायद्याची असून 153 दिवसांचा हा कालावधी खूप अनुकूल ठरणार आहे.
शनीच्या कृपेने या व्यक्तींच्या मानसन्मानात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल तसेच नव्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळेल. कुटुंबीयांसोबतचे संबंध देखील उत्तम राहतील व धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग चालून येईल. तसेच जोडीदाराकडून देखील काही आनंदी बातमी मिळेल. वैवाहिक जीवन देखील खूप आनंददायी असेल.
3- मेष– कुंभ राशीतील शनि मेष राशींच्या व्यक्तींसाठी पुढील 153 दिवसांसाठी खूप शुभ आणि फलदायी असणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपासून जर तुमची काही कामे अडकलेली असतील तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होणार आहे. समाजामध्ये पद प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढीस लागेल. मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल तसेच त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करू शकतात. या कालावधीमध्ये मेष राशींच्या व्यक्तींना जर आर्थिक अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होईल व उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.
4- सिंह– कुंभ राशीमध्ये विराजमान असलेला शनि सिंह राशींच्या व्यक्तींसाठी फायद्याचा आणि भाग्यकारी ठरणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला आई-वडिलांची खूप साथ मिळेल तसेच आर्थिक स्थैर्य देखील लाभेल. आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी वाढेल. या कालावधीमध्ये जर कुठे गुंतवणूक केली तर ती फायद्याचे ठरेल.
काही कर्ज असेल तर ती देखील फेडण्यास मदत होईल व नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी उत्तम असून त्यांना या कालावधीत करिअरमध्ये मोठे यश मिळेल.
तसेच प्रमोशनच्या देखील संधी चालून येतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे व विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी उत्तम राहणार आहे.
( टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा दावा करत नाही.)