अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : गुन्हेगारांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आणखी चार पोलीस गंभीररित्या जखमी झाले आहेत.
Around 7 of our men were injured. Operation still underway as criminals managed to escape, taking advantage of the dark. IG, ADG, ADG (Law & Order) have been sent there to supervise operation. Forensic team from Kanpur was at spot, an expert team from Lucknow also being sent: DGP https://t.co/WdqVMbKgXk
— ANI UP (@ANINewsUP) July 3, 2020
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह 8 पोलीस शहीद झाले.
विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला
विकास दुबे या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेले होते. सुरुवातीला पोलिसांच्या गाड्या अडवण्यासाठी गुंडांनी जेसीबी उभा करुन रस्ता अडवला. यानंतर पोलीस जेव्हा गाड्यांमधून बाहेर आले
त्यावेळी जवळपास १५ ते १६ गुंडांनी छतावरून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आले.
मात्र, गुंड उंचावरुन गोळीबार करत असल्याने त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आठ पोलिसांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उप पोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
दरम्यान ही बातमी समजताच एसएसपी आणि आयजी घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक टीमनेही येथे तपासकार्य सुरू केलं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews