अविश्वसनीय अशी दिवाळी भेट ! चहाच्या मळ्याच्या मालकाने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दिली चक्क ‘ही’ बाईक,काहींनी दिली कार भेट

Ajay Patil
Published:

Marathi News : दिवाळी हा एक भारतातील सर्वात मोठा सण असून संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला जातो.

इतकेच नाही तर अनेक खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्या त्या कंपन्यांकडून दिवाळी बोनस, आकर्षक भेटवस्तू, मिठाई तसेच सुकामेवा आणि आकर्षक असे गिफ्ट व्हाउचर देखील भेट म्हणून दिले जातात.

काही काही ठिकाणी तर पैसे देखील दिले जातात. कंपनीचे मालक किंवा सरकार यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त अशा पद्धतीच्या भेटी देण्याच्या पद्धती मधून मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये एक विश्वास आणि सौहार्दपूर्ण नाते घट्ट होत असते.

अशा गिफ्ट किंवा बोनस यांचे महत्त्व पैशांपुरते मर्यादित नसून ते एक मनातील बंध जुळण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत. अशाच काही कंपन्या असतात की त्या खूप मोठ्या वस्तू भेट म्हणून देतात व त्यांची देशभर चर्चा होत असते.

या लेखामध्ये आपण अशाच एका कंपनी विषयी माहिती घेणार आहोत ज्या कंपनीने कर्मचाऱ्यांना ज्या भेटवस्तू दिल्या त्या खरच देशात चर्चा होण्याइतपत लायक आहेतच परंतु कौतुकास्पद देखील आहेत.

चहा मळा मालकाने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली रॉयल एनफिल्ड बाईक्स

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामिळनाडू राज्यातील कोटागिरी शहरात असलेल्या चहाच्या मळ्याच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क रॉयल एनफिल्ड बाईक दिले आहेत.

यासोबतच हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मासुटिकल कंपनीने कर्मचाऱ्यांना चक्क दिवाळीनिमित्त कार गिफ्ट केले आहेत. जर आपण कोटागिरी येथील चहाच्या मळ्याच्या मालकाचा विचार केला तर त्यांचे नाव पी शिवकुमार असून त्यांचा 190 एकर चहाचा मळा आहे.

दरवर्षी पी शिवकुमार हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून अनेक गृहपयोगी वस्तू आणि रोख रक्कम बोनस म्हणून देत असतात. परंतु यावर्षी मात्र त्यांनी कर्मचाऱ्यांना दोन लाख रुपयापेक्षा जास्त किंमत असलेली बाईक देण्याचा निर्णय घेतला.

या चहाच्या मळ्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून 627 कर्मचारी काम करत आहेत. यामधून त्यांनी व्यवस्थापक तसेच सुपरवायझर, स्टोअर कीपर, कॅशियर तसेच फील्ड स्टाफ आणि चालकांसह 15 कर्मचाऱ्यांना बाईक भेट दिल्या.

हरियाणा मधील मिट्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या फार्मासिटिकल कंपनीने देखील बारा कर्मचाऱ्यांना कार भेट दिली असून इतर 38 कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. या कंपनीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे

अशा बारा कर्मचाऱ्यांना त्यांनी कार देण्याचा निर्णय घेतला आहे व येणाऱ्या कालावधीत आणखी 38 कर्मचाऱ्यांना कार देण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड तर होईलच परंतु कर्मचारी आणि मालक यांच्यातील नाते वृदींगत होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe