भारतात आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल! आयफेल टॉवरपेक्षा देखील आहे उंच; बांधण्यासाठी आला आहे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च

Ajay Patil
Published:
chinaab bridge

भारतात आपल्याला अशा अनेक गोष्टी दिसून येतात की त्या जगात तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. मग त्या नैसर्गिक विविधतेच्या बाबतीत असो किंवा भौगोलिक विविधतेच्या बाबतीत असो अशा अनेक गोष्टी आपल्याला भारतात दिसतात. तसेच आता भारतामध्ये जे काही रेल्वे आणि रस्ते प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये इंजीनियरिंग चा चमत्कार पाहायला मिळत असून अशा प्रकल्पांमध्ये अनेक पूल तसेच प्रकल्प हे जगात सर्वाकृष्ट असे उभारले जात आहेत.

भारताने आता तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी प्रगती केली असून असे प्रकल्प उभारताना अनेक अशक्य गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य केल्या आहेत व जगात भारताची मान उंचावेल असे रेल्वे पूल तसेच भुयारी मार्ग, समुद्रीमार्ग भारतात उभारले जात आहेत.

याच दृष्टिकोनातून जर आपण  जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून जर पाहिले तर तो चिनाब पुल असून हा पूल भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. एवढेच नाही तर या उंच रेल्वे पुलावर सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली रेल्वे चाचणी देखील करण्यात आलेली आहे व याचे व्हिडिओ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच शेअर केलेले आहेत.

 चिनाब पूल आहे जगातील सर्वात उंच पुल

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेला हा जगातील सर्वात उंच पूल असून तो पॅरिस येथे असलेल्या आयफेल टॉवर पेक्षा देखील उंच आहे. आपण या चिनाब पुलाची उंची पाहिली तर ती चिनाब नदी पात्रापासून तब्बल 1178 फूट उंच आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षा हा चिनाब पूल 35 मीटर उंच आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्यातील जर आपण भूभाग आणि हवामान पाहिले तर अतिशय कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हा पूल उभारला गेलेला आहे. चीनाब पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब पूलाच्या एका घाटावर बांधण्यात आला असून याला चिनाब आर्क ब्रिज म्हणून देखील ओळखले जाते.

तब्बल 14000 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे व पुढील 120 वर्षापर्यंत हा पूल आहे त्या स्थितीत राहील असे देखील सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा पूल उभारताना खूप काळजी घेण्यात आलेली आहे. जसे की चिनाब पूल 260 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाऱ्यांना तसेच उच्च तापमान आणि एवढेच नाही तर भूकंप सारख्या परिस्थितींना देखील तोंड द्यायला सक्षम आहे. हा पुल उभारण्यासाठी तब्बल 30000 मॅट्रिक टन स्टील वापरण्यात आलेले आहे.

 या उंच पुलावरून घेण्यात आली रेल्वेची यशस्वी चाचणी

या उंच असलेल्या पुलाची स्थिरता आणि सुरक्षितता तपासता यावी याकरिता रेल्वेच्या चाचण्या घेण्यात आल्या. या मार्गावरील सांगलदान ते रियासी विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर रियासी आणि कटरा दरम्यानच्या 17 किमी लांबीच्या रुळाचे काम आता बाकी आहे. मीडिया रिपोर्ट नुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत सांगलदान ते रियासी विभागाची तपासणी केली जाणार आहे.

लवकरच या जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलावरून रामबन ते रियासी पर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. हा पूल म्हणजे जगातील आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. जगातील हे आठवे आश्चर्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे हा चीनाब पूल रेल्वेच्या सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण ठरला आहे व वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे कधी सुरू होईल याबाबत मात्र अजून देखील तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe