अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार 2000 रुपयांचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सातवा हप्ता 10 डिसेंबर, 2020 पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.
या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत हप्ते शेतक-यांना पाठविण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते.
पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. सातव्या हप्त्याचा लाभ 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकर्यांना मिळणार आहे. मात्र, त्यांची कागदपत्रे बरोबर असणं आवश्यक आहे.
जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. काही शेतकर्यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत, कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा आधारकार्डची माहिती उपलब्ध नाही.
मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकर्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.
- 1.पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
- 2.पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261
- 3.पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401
- 4.पंतप्रधान किसन यांची नवीन हेल्पलाईन: 011-24300606
- 5.पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109 ईमेल आयडी: [email protected]
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved