आठ कोटींचे रक्तचंदन जप्त,तिघांना अटक

Ahmednagarlive24
Published:

भोपाळ : मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय ‘टायगर स्ट्राइक फोर्सच्या (एसटीएसएफ) सतर्कतेमुळे धार जिल्ह्यातील एका टोलनाक्याजवळ तब्बल ८ कोटी रुपयांचे १५,५०० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले.

यावेळी तामिळनाडूतील दोघांसह ३ तस्करांना अटक केल्याचे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपी एका वाहनातून विदेशात मागणी असणारे रक्तचंदन चेन्नई येथून मुरादाबादकडे घेऊन जात असताना धामनोद येथील खलघाट टोलनाक्याजवळ एसटीएसएफच्या पथकाने ही कारवाई केली. यानंतर तामिळनाडूतील तिरुवल्लुवर येथून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment