टोमॅटोचा दर कडाडला

Published on -

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कांद्यानंतर आता टोमॅटो ८० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कर्नाटकसह प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरवठा प्रभावित झाला असून, त्यामुळे टोमॅटोचे दर कडाडले आहेत.

मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये कांदा आता ६० रुपये आहे. मागील काही दिवसांत टोमॅटो महागला आहे. टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ही वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये टोमॅटोचे सरासरी दर १ ऑक्टोबरच्या ४५ रुपये प्रति किलोच्या दरात वाढ होऊन बुधवारी ५४ रुपये प्रतिकिलो झाला. ‘मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वेगाने वाढत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News