हा मंत्री म्हणतोय कांदा महाग झालाय तर मग कमी खा !

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस कांदा भडकत चालला आहे. अशावेळी कांद्यासंदर्भात एका पत्रकाराने केलेल्या प्रश्नाला यूपीमधील मंत्र्याने आगळावेगळा सल्ला दिलेला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी ‘दर वाढले तर कमी कांदा खावा’, असा सल्ला दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले अतुल गर्ग हे हरदोईच्या दौऱ्यावर होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री असलेल्या अतुल गर्ग यांनी चालू वर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतीमाल असलेल्या कांद्याचे दर भडकले आहेत. तेव्हा जेवणाला चव येण्यासाठी वापरात येणारा कांदा जास्तीत जास्त ५० ते १०० ग्रॅम इतकाच खावा. लोकांनी कांदा हा कमी खाल्ला पाहिजे, असा सल्ला मंत्र्यांनी दिलेला आहे. अशाप्रकारे स्वत:चे मत मांडल्यानंतर स्वत:च मोठ्याने हसत गाडीकडे गेले आणि उपस्थितांमध्येही हशा पिक ला.

त्यांच्या वक्तव्यावर मत मांडताना, या उत्तरातून भाजपाचा अहंकार दिसून येत असल्याचे समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेले आहे. सरकारची वक्रदृष्टी आता सर्वसामान्यांच्या थालीवर पडलेली आहे. भाजप आणि सरकारच्या पाठिंब्याने साठेबाज कांद्याचे दर वाढवत आहेत, असे समाजवादी पक्षाचे नेते मिस्बाहुद्दीन अहमद यांनी म्हटलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment