तीन मित्रांनीच केली तरुणाची कुऱ्हाडीने हत्या;कारण ऐकून व्हाल थक्क

Ahmednagarlive24
Published:

उत्तर प्रदेश येथील फतेहपूर येथे तीन तरुणांनी आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बायकोची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे. प्रदीप कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे.

एका वृत्तानुसार, फतेहपूर येथील मलवा गावातला प्रदीप कुमार हा तरुण रविवारी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेतातल्याच एका झोपडीत त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह सापडला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा काही ग्रामस्थांनी प्रदीपला त्याचा मित्र रजोल याच्यासोबत शेवटचं पाहिल्याचं सांगितलं.

संशयावरून रजोल याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याचं कबूल केलं. प्रदीप याने रजोलच्या पत्नीची काही दिवसांपूर्वी छेड काढली होती.

त्याचा राग रजोलच्या मनात होता. त्याने दोन अन्य मित्रांच्या साथीने प्रदीप याच्या हत्येचा कट रचला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment