आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे असे शासकीय कागदपत्र असून ते आपल्या ओळखीचा पुरावा देखील आहे. एवढेच नाही तर बँकिंगच्या प्रत्येक कामाकरिता तुम्हाला आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला आधार कार्ड शिवाय मिळू शकत नाही.
अशाप्रकारे आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्रे असल्यामुळे त्याची काळजी घेणेदेखील तितकेच गरजेचे आहे. अशा प्रसंगी जर समजा एखाद्या वेळेस काही कारणाने जर तुमच्या आधार कार्ड हरवले तर ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडण्याची शक्यता असते व अशा व्यक्तीच्या हातात जर पडले तर त्याचा वापर इतर बेकायदेशीर गोष्टींसाठी होऊ शकतो
व यामुळे मात्र तुम्ही अडकण्याची शक्यता वाढू शकते. तुमचा जो काही आधार बायोमेट्रिक डेटा आहे त्याचा गैरवापर हा काही फसवणूक करणारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी देखील काही व्यक्ती करू शकतात.
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा आधार कार्डचा गैरवापर टाळायचा असेल तर तुम्हाला ते लॉक करणे खूप गरजेचे आहे. यासाठीची सुविधा ही युआयडीएआय कडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड हरवले तर ते लॉक कसे करावे? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
आधार कार्ड लॉक आणि अनलॉक म्हणजे नेमके काय?
जर तुम्ही आधार कार्ड लॉक केले तर त्यामुळे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून जे काही फसवेगिरी करणारे व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही बायोमेट्रिक्स, यूआयडी तसेच युआयडी टोकन व ओटीपी सारख्या कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड वापरण्यापासून तुम्ही थांबवू शकतात.
तुम्हाला जर आधार कार्ड नवीन मिळाले तर त्यामुळे तुम्ही युआयडीएआयच्या वेबसाईट किंवा mAadhar ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा युआयडी अनलॉक करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमचा युआयडी अनलॉक करतात तेव्हा तुम्ही यूआयडी, यूआयडी टोकन आणि व्हीआयडी वापरून प्रमाणिकरण पुन्हा सुरू करू शकता.
अशा पद्धतीने करू शकता तुम्ही आधार कार्ड लॉक
1- सर्वप्रथम यूआयडीएआय वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जावे.
2- त्यानंतर माय आधारवरील टॅबवर क्लिक करावे.
3- त्यानंतर या ठिकाणी असलेल्या आधार सेवा विभागामध्ये जावे आणि आधार लॉक/ अनलॉक वर क्लिक करावे.
4- त्यानंतर लॉक युआयडी पर्याय निवडावा.
5- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक तसेच पूर्ण नाव आणि पिन कोड टाकावा व ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करावे.
6- त्यांचा तुम्हाला जो काही ओटीपी मिळेल तो त्या ठिकाणी नमूद करून नंतर सबमिट करावे.
7- अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड लॉक करून त्याचा होणारा गैरवापर थांबवू शकतात.