धक्कादायक ! रागाच्या भरात आईने २ वर्षीय चिमुकल्याला कंटेनरखाली फेकले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या महिलेने आपल्या दोन वर्षीय मुलाला कंटेनरखाली फेकून दिल्याचे घटना घडली. यात त्याचा चिरडून मृत्यू झाला.

हे प्रकरण का घडले ? या मागची कथाही हृदयद्रावक आहे. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथे राहणाऱ्या एका विवाहितेला पतीपासून सन २०१६ मध्ये मुलगा झाला.

त्यानंतर पतीचे नातेवाईक असलेल्या नांदेड तालुक्यातील बोंडार येथील एका तरुणाकडे तिचे येणे-जाणे सुरू झाले. त्यातून त्यांचे प्रेमप्रकरण रंगले. या अनैतीक संबंधातून सन २०१८ मध्ये तिला दुसरा मुलगा झाला.

या प्रेम प्रकरणाची माहिती तिच्या पतीलाही मिळाली होती. आमच्या संबंधातून हा मुलगा झाल्याची बाब तिच्या पतीला दोघांनीही सांगितली. पतीनेही त्यांचे प्रेमसंबंध मान्य केले.

याउपरही या विवाहितेच्या पतीने स्वत:चे व पत्नीच्या प्रियकराच्या मुलाचे संगोपन सुरू ठेवले होते. संबंधीत विवाहिता व तिच्या प्रियकराचे भांडण झाले आणि हे प्रकरण गतवर्षी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात पोहोचले.

तेव्हापासून तिचा प्रियकर डोंगरकड्याला येत नव्हता. मात्र, १८ मे रोजी प्रियकराने या विवाहितेच्या पतीला फोन केला आणि तुझा, माझा मुलगा व तुझ्या पत्नीला बोंढारला आणून सोड असे बजावले.

त्याने ही बाब पत्नीला सांगितली. दोघेही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन २१ मे रोजी बोंढार येथे पोहोचले. बोंढारमध्ये काही नातेवाईकांनाही बोलावून घेण्यात आले आणि आम्ही माझा मुलगा व प्रेयसीला ठेवून घेणार आहोत,

असे प्रियकराने सांगितले. २२ मे रोजी सकाळी उठून या विवाहितेचा पती डोंगरकड्याला निघाला असता प्रियकराने मी कुणाचाही सांभाळ करणार नाही,

तुम्ही घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे विवाहिता, मुलगा व पती हे गावाकडे जाण्यासाठी पायी निघाले. बोंढार बायपासवर येताच विवाहितेला राग अनावर झाला आणि तिने समोरुन आलेल्या कंटेनरखाली दोन वर्षीय चिमुकल्याला फेकून दिले. या घटनेत हा चिमुकला ठार झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment