स्टेट बँकेचा अलर्ट : ‘तो’ फोन उचलू नका अन्यथा तुमचे अकाउंट होईल खाली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक ट्विट जारी केले आहे.

ट्वीटद्वारे बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क केले आहे की, आजकाल बरेच लोक एसबीआयच्या नावाने लोकांना कॉल करीत आहेत आणि त्यांची वैयक्तिक माहिती विचारत आहेत. आपणासही या प्रकारचा फोन आला तर सावधगिरी बाळगा आणि आपली कोणतीही माहिती शेअर करू नका.

आपण जर या फोनकॉलला बाली पडलात तर आपले बँक खाते रिकामे होईल. अशी घटना उघडकीस आली आहे ज्यामध्ये स्वत: एसबीआय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका कॉलरने ग्राहकांच्या खात्यातून 2.22 लाख रुपये उकळले आहेत. त्यानंतर ही बाब बँकेपर्यंत पोहोचली तेव्हा समजले की ही फसवणूक झाली आहे.

केवायसी व्हेरिफाईच्या नावे फोन येत आहेत :- स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांना सांगितले आहे की काही सायबर गुन्हेगार बँक अधिकारी असल्याचे भासवून केवायसी पडताळणीच्या नावाखाली लोकांना कॉल करीत आहेत आणि त्यांना माहिती मिळताच त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत.

अशा कॉल किंवा मेसेजपासून सावध रहा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. एसबीआयने सांगितले की फसवणूक करणारा आपला फोन किंवा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून आपला वैयक्तिक तपशील मिळवण्यासाठी फोन कॉल करतो किंवा मजकूर संदेश पाठवितो. आपल्याबाबतीतही असे काही होत असल्यास cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा.

10 रुपयांचे पेमेंट आणि 2.22 लाख रु उडवले :- असेच काही एसबीआय ग्राहकाच्या बाबतीत घडले. वास्तविक, त्यांना एक फोन आला. आणि ग्राहकाने त्याची माहिती शेअर केली. त्यानंतर नेट बँकिंगद्वारे ठगांनी खाते पडताळणीच्या नावाखाली 10 रुपये टाकले.

त्यानंतर ग्राहकास मोबाइल बँकिंगद्वारे पुन्हा रक्कम भरण्यास सांगितले गेले. असे केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 1.35 लाख रुपये कट झाले. यानंतर कॉलरने डेबिट कार्डद्वारे 10 रुपये देण्यास सांगितले. यावेळी पुन्हा खात्यातून 72,000 रुपये कट झाले. अशा प्रकारे ग्राहकाचे 2.22 लाख रुपये पळवले गेले.

हि माहिती शेअर करू नका :- एसबीआयने आपले पॅन तपशील, आयएनबी क्रेडेंशियल्स, मोबाइल क्रमांक, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए कोणाबरोबरही सामायिक करू नये असे सांगितले आहे.

फ्रॉड्सपासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा ;-

  • – आपली पर्सनल बँकिंग डिटेल कोणाबरोबरही कधीही सामायिक करु नका.
  • – आपला खात्याचा पासवर्ड सतत बदला.
  • – फोन, ईमेल किंवा एसएमएसवर कधीही आपली इंटरनेट बँकिंग तपशील सांगू नका.
  • – संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका.
  • – कोणत्याही बँकेशी संबंधित माहितीसाठी नेहमीच एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती पहा.
  • – फसवणूक करणार्‍यांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी किंवा नजीकच्या एसबीआय शाखेत तक्रार नोंदवा.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment