नवी दिल्ली :- चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाला आपले लक्ष्य केले आहे. या व्हायरसवर वॅक्सीन शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
परंतु या 3-4 महिन्यांत या विषाणूने आपले स्वरूप खूप वेळा बदललेले दिसून येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहेत. अमेरिकेतल्या एका अभ्यासानुसार कोविड-19 हा आजार वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो.
सुरुवातीला फक्त वयस्कर व्यक्तींना या व्हायरसची लागण होत होती. 60 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना हा व्हायरस आजारी पाडत होता. मात्र आता तरुणांमध्ये या व्हायरसची प्रकरणं वाढत असून त्यांचाही मृत्यू होत आहे.
तर लहान मुलांनांही या व्हायरसची लागण झाली आहे. काही लहान मुलांचाही या व्हायरसने बळी घेतला आहे. विषाणू का बदलतोय आपले रूप ? वयस्कर, मधुमेह, हृदय, फुफ्फसांचे आजार असलेल्यांना याचा धोका जास्त आहे.
मात्र मृत्यूच्या बाबतीत या व्हायरसची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही.वृद्ध व्यक्ती इतर आजारपणांमुळे लवकर बरे होत नाहीत. मात्र निरोगी व्यक्तींनाही हा आजार बळावत आहे.कदाचित लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कशी लढा देते यावर अवलंबून आहे.