मजुरांची दैना संपेना! पुन्हा अपघात; 23 लोकांचा मृत्यू

Published on -

औरेया लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरात मजूर अडकून पडले. यातील बराचश्या मजुरांनी पायी प्रवास सुरु केला व घर गाठले.

परंतु हा खडतर प्रवास कारण अनेकांच्या जीवावर बेतलं आहे.

मागील काही दिवसांत झालेले अपघातांच्या घटना ताज्या असतानाच औरैया येथे फरिदाबाद येथून 81 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलची जोरदार धडक झाली.

या अपघातात जवळपास 23 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.

ट्रक खाली अडकलेल्या मजुरांचे मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे.

तर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News