अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज 12 वाजता पीएम किसान सम्मान निधि निधीतून पैसे पाठवतील.
आज पीएम किसान योजनेंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 18000 कोटी रुपये पाठविले जातील. पीएम किसानचा 7 वा हप्ता आज शेतकर्यांच्या बँक खात्यात येत आहे.
आज पीएम मोदी 6 राज्यातील लाखो शेतकर्यांशी वर्चुअल चर्चा करतील. भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज 96 वी जयंती आहे. अटल जी यांच्या कार्यक्रमातच ही रक्कम शेतकर्यांना दिली जाईल.
स्वतः पीएम मोदी यांनी ट्विट करुन माहिती दिली :- पीएम मोदींनी काल आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘उद्याचा दिवस देशाच्या अन्नदात्यांसाठी फार महत्वाचा आहे. दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जाहीर करण्याची संधी मिळेल. या निमित्ताने अनेक राज्यातील शेतकरी बांधवांशी संवाद साधतील.
हि आहे पीएम किसान योजना :- पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे वर्षामध्ये 3 हप्ते मिळतात. अशा प्रकारे एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजना मोदी सरकारने 1 डिसेंबर 2018 रोजी लागू केली. या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविले जातात.
9 कोटी शेतकर्यांना पैसे मिळतील :- आज 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी 9 कोटीहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवतील. त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात पीएम मोदी 6 राज्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दिल्लीतील हजारो शेतकरी नवीन कृषी कायद्यांचा निषेध करत आहेत. हे लक्षात घेता पंतप्रधान मोदी शेतकर्यांशी बोलतील असे म्हटले जात आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved