अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटला भेट दिली. यावेळी त्यांनी सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावला यांच्याशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे अशी माहितीही अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिली.
कोरोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार असल्याचे अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांना सांगीतले असून लशीच्या तयारीबाबतची सर्व माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्यूट सरकारकडे परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती देखील पुनावाला यांनी दिली आहे.
सीरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशा किंमतीत ही लस उपलब्ध केली जाणार असल्याचे पूनावाला म्हणाले. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे.
सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने भारतात विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल असं अदर पुनावाला यांनी जाहीर केलंय.
ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे अशी माहितीही अदर पुनावाला यांनी दिली. करोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार अशीही माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.
कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना एप्रिल महिन्यात प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हीशील्ड या लसीचे डोस बनवणं सुरु केलं. कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved