अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-सध्याच्या लॉक डाउनच्या काळात सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या काळात सर्वच लोक आर्थिक चणचण भागवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अशातच शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटातील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हांडाच सापडला.
विनायक बाबासाहेब पाटील असे या शेतकऱ्यांचे नाव असून राष्ट्रीय संपत्ती म्हणुन हा पुरातन खजिना या शेतकऱ्याने प्रामाणिकपणे प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे.
अणुस्कुरा घाटातील गट नंबर 186 मध्ये शेतात मशागत केल्यानंतर काजूची लागवड करताना बुधवारी रात्री एका मातीच्या मडक्यात अनेक वर्षांपूर्वी जमिनीत पुरून ठेवलेला हा खजिना सापडला.
ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने सापडलेली सर्व नाणी प्रशासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला. त्यानुसार काल रात्रीच प्रशासनाकडून रितसर पंचनामा करून ही प्राचीन सुवर्ण नाणी ताब्यात घेण्यात आली.
दरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या घरातून 716 गुप्तधन नाणी पंचनामा करून ताब्यात घेऊन, तहसील कार्यालयात लॉकरमध्ये सीलबंद करून ठेवलेली आहेत.
2 सेमी व्यास व 2 मि.मि. जाडीची ही चांदी व सोन्याची नाणी असल्याची माहिती शाहुवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com