10वी आणि आयटीआय विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी | मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत भरती | ISRO HSFC Bharti 2024

Aadil Bagwan
Updated:

ISRO HSFC Bharti 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्र अंतर्गत ISRO HSFC ने नुकतीच 103 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. इस्रो ही एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था असून येथे नोकरी करते म्हणजे देशाच्या अंतराळ कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणे होय. ISRO HSFC अंतर्गत 10वी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे त्यामुळे दहावी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी नक्की अर्ज करावा. 

ISRO HSFC Bharti 2024 Details 

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र या भरतीमध्ये  वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक (राजभाषा), ड्राफ्ट्समन अशा अनेक पदांसाठी ही भरती होत आहे यातील काही पदांसाठी दहावी किंवा आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 आहे या तारखे अगोदर तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल.

या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?

या भरतीसाठी काही तांत्रिक किंवा प्रशासकीय पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच तंत्रज्ञ आणि इतर काही तांत्रिक पदांसाठी आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा 

या भरतीसाठी जे इच्छुक उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे. 

How To Apply ISRO HSFC Bharti 2024

मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरतीसाठी खाली दिलेल्या स्टेप नुसार तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता-

  • अर्ज करण्यापूर्वी अर्जदार उमेदवाराने पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक नक्की वाचावी त्यानंतरच अर्ज सादर करावा.
  • पीडीएफ जाहिरात ची लिंक खाली दिलेले त्यावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचू शकता.
  • या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज भरल्यानंतर एकदा नक्की तपासा की आपण दिलेली माहिती बरोबर आहे की नाही कारण अर्ज हा तुम्हाला एकदाच भरता येणार आहे. त्यात नंतर कोणतेही बदल करता येणार नाही त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2024

महत्वाच्या लिंक

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.isro.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe