Isro Recruitment 2023:- भारतीय अवकाश अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ही एक अवकाश संशोधनाच्या बाबतीत फार मोठी भूमिका पार पाडते. इस्त्रोमध्ये नोकरी मिळावी ही बऱ्याच जणांची इच्छा असते. परंतु बऱ्याचदा इस्रोमध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो व तरी देखील यश मिळत नाही.
परंतु आता इसरो मध्ये नोकरी करायची असेल तर चक्क दहावी पास विद्यार्थ्यांना देखील इस्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या ठिकाणी टेक्निशियन बी पदांकरिता रिक्त जागा असून या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. याच भरती विषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

इस्रोमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
ज्या रिक्त पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच पदनिहाय असलेल्या संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा देखील असावा व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा डिप्लोमा एनसीव्हीटी द्वारे मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे. इस्रोची ही भरती राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अर्थात येणार एनआरएससीसाठी होणार आहे.
रिक्त पदे व लागणारी शैक्षणिक पात्रता
1- टेक्निशियन बी(इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)- या पदाकरिता ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते दहावी पास असणे गरजेचे आहे आणि अशा उमेदवाराकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला व एनसीव्हीटी मधून इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये आयटीआय/ एनटीसी/ एनएसी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
2- टेक्निशियन बी( इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)- या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास असणे गरजेचे आहे व माध्यमिक शाळा सोडण्याचा दाखला असावा. तसेच एनसीवीटी मधून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेड मध्ये आयटीआय/ एनटीसी/ एनएसी उत्तीर्ण असावा.
3- टेक्निशियन बी( इलेक्ट्रिकल) या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवार दहावी पास असावा आणि त्याकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे. तसेच एनसीवीटी मधून इलेक्ट्रिकल ट्रेड मध्ये आयटीआय अथवा एमटीसी अथवा एनएसी उत्तीर्ण असावा.
4- टेक्निशियन बी( फोटोग्राफी)- या पदाकरिता देखील उमेदवार दहावी पास असणे गरजेचे आहे व माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा. तसेच एनसीव्हीटी मधून डिजिटल फोटोग्राफी/ फोटोग्राफीमध्ये ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
5- टेक्निशियन बी( डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर)- या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी पास असावा आणि त्याकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे. तसेच एनसीव्हीटी मधून डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ट्रेडमध्ये आयटीआय/ एनटीसी/ एनएसी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा किती लागेल?
भरती करिता पात्र उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 ते कमाल 35 वर्ष असणे गरजेचे आहे. वयोमर्यादेमध्ये एससी/ एसटी उमेदवारांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली असून ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.
निवड कशी केली जाईल?
या भरतीमध्ये लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा..
80 बहुपर्यायी प्रश्नांची असून तिचा कालावधी एक तास तीस मिनिटांचा आहे. तसेच एका चुकीच्या उत्तरांकरिता 0.33 गुण वजा करून प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण देण्यात येणार आहे. उत्तीर्ण होण्याकरता उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये 80 पैकी कमीत कमी 32 मार्क्स असणे गरजेचे आहे व कौशल्य चाचणीत 100 पैकी 50 गुण मिळवणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या कामगिरीचा आधारे किमान दहा उमेदवारांसह कौशल्य चाचणी करिता निवड 1:5 ज्या प्रमाणामध्ये करण्यात येईल व ही कौशल्य चाचणी हैदराबाद येथे बॅचमध्ये घेतली जाणार आहे.
या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी किती शुल्क आहे?
याकरिता अर्ज शुल्क 100 रुपये आहे पण सुरुवातीला सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क प्रक्रिया शुल्क म्हणून पाचशे रुपये भरावे लागेल.
किती आहेत एकूण रिक्त पदे?
ही भरती 54 रिक्त पदांसाठी घेण्यात येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?
ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल अशा उमेदवारांना 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये मासिक वेतन मिळेल. तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार अनेक भत्त्यांचा लाभ देखील दिला जाणार आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
या भरती करिता अर्ज 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झाले असून अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.