NIN Pune Bharti 2024 : पुण्यात नोकरीची संधी ! अकाउंटंट पासून ‘या’ पदांसाठी भरती सुरु, येथे पाठवा अर्ज !

Content Team
Published:
NIN Pune Bharti 2024

 

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, या भरती साठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, यासाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकता.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत “अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट, फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जानेवारी 2024 पासून सुरु होईल.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असेल, येथे १० वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी जागा आहेत, तरी उमेदवारांनी पदांनुसार शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावेत. वरील भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे इतकी आहे.

तसेच यासाठी अर्ज शुल्क 500/- रुपये आकारण्यात येत आहेत. तरी SC, ST, EWS उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. या भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही https://www.ninpune.ayush.gov.in/ ला या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज https://www.ninpune.ayush.gov.in/Nincareer/careerhomepageview या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या 19 जानेवारी 202 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल.
-आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी संपेल.
-लक्षात घ्या वरील भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.