वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र ठरलेल्या ‘त्या’ लाखो उमेदवारांना लोकसेवा आयोगाचा दिलासा! आयोगाने वयोमर्यादेत केली 1 वर्षाने वाढ

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वयोमर्यादाच्या बाबतीत एक दिलासा देण्यात आला असून यामुळे वयोमर्यादा ओलांडली गेल्यामुळे अपात्र ठरलेल्या लाखो उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर आता दिलासा मिळण्यास मदत झालेली आहे.

Ajay Patil
Published:
mpsc

MPSC Decision:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वयोमर्यादाच्या बाबतीत एक दिलासा देण्यात आला असून यामुळे वयोमर्यादा ओलांडली गेल्यामुळे अपात्र ठरलेल्या लाखो उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर आता दिलासा मिळण्यास मदत झालेली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध पदांच्या जाहिरातीमध्ये बदल करण्याकरिता जो काही वेळ लागला होता त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती व त्यामुळे लाखो उमेदवार अपात्र ठरले होते.

या पार्श्वभूमीवर आता राज्य लोकसेवा आयोगाने एमपीएससीच्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये एका वर्षांने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कमाल वयोमर्यादेचा लाभ फक्त अशा उमेदवारांना मिळणार आहे ज्यांनी एक जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत पद भरतीसाठी नव्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींसाठी अर्ज केलेला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्य लोकसेवा आयोगाकडून गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षांच्या तारखांमध्ये देखील आता बदल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने एमपीएससीच्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादित केली एक वर्षांने वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या जाहिरातींमध्ये बदल करण्यासाठी आयोगाला जो काही वेळ लागला होता.त्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली गेली होती व ते त्यामुळे अपात्र ठरले होते.

परंतु अशा पद्धतीने पात्र ठरलेल्या लाखो उमेदवारांना आता आयोगाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये तब्बल एक वर्षाने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

परंतु या निर्णयाचा लाभ फक्त त्या उमेदवारांना मिळणार आहे ज्यांनी एक जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत पद भरतीसाठी नव्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींसाठी अर्ज केला होता अशा उमेदवारांनाच मिळणार आहे. आपल्याला माहित आहे की,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकारचे विविध विभागांमधील पदे भरली जातात.

परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता दहा टक्क्यांचे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तोपर्यंत विविध पदांसाठी काढलेल्या जाहिरातींमध्ये मात्र या आरक्षणासंबंधीचा कुठलाच उल्लेख केलेला नव्हता.त्यामुळे या जाहिराती मागे घेण्यात आल्या होत्या.

त्यामुळे भरतीसाठी काढण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये बदल करून मराठा आरक्षणाचा समावेश करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर मात्र या सुधारित जाहिराती प्रसिद्ध होण्यासाठी बराच वेळ लागला व त्याचा थेट परिणाम भरती प्रक्रियेवर दिसून आला.

या सगळ्या प्रक्रियेला काही महिने लागले व त्यामुळे पहिल्या जाहिराती वेळी जे उमेदवार वयाच्या अटीमध्ये पात्र ठरले होते त्यातील बरेच उमेदवार मात्र नंतरच्या नव्या जाहिरातीत अपात्र ठरले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली काही चूक नसल्यामुळे ही संधी जाऊ नये म्हणून उमेदवारांनी वयोमर्यादा वाढवावी अशा प्रकारची मागणी लावून धरली होती.

त्यामुळे आता राज्य सरकारने या मागणीची दखल घेत एक जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 यादरम्यान पद भरतीसाठी नव्याने प्रसिद्ध झालेल्या आणि निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार न पडलेल्या जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता दिलासा दिला आहे.

यामध्ये आता अशा उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली असून राज्य शासनाच्या या निर्णयानंतर राज्य लोकसेवा आयोगाने 23 डिसेंबर म्हणजेच आज त्यासंबंधीचे नोटिफिकेशन काढले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही पेपरच्या वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe