50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांना मिळाल प्रोत्साहन अनुदान ; 19.92 कोटी खात्यात जमा

Ajay Patil
Published:
50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गत ठाकरे सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये सत्तेत रूढ झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.

त्यावेळी पीक कर्जाची नियमित फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतच अनुदान दिलं जाणार अशी योजना तत्कालीन सरकारने आखली. मात्र त्यानंतर कोरोना आला म्हणून सरकारला हे अनुदान देता आले नाही. दरम्यान राज्यात सत्ता बदल झाला. शिंदे सरकार राज्यात उदयास आले. पण शिंदे सरकारने पूर्वीच्या सरकारचा अनुदानाचा निर्णय कायम ठेवला.

29 जुलै 2022 ला राज्य शासनाने 2017-18, 2018-19, 2019 20 यापैकी किमान दोन वर्षे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचा प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यंदा तब्बल अडीच वर्षानंतर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या अनुदानाला मुहूर्त सापडला आहे. प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यात मिळणार आहे.

ऑक्टोबर मध्ये अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा पहिला टप्पा म्हणजेच पहिली यादी प्रसिद्ध झाली असून ज्या शेतकरी बांधवांनी आधार प्रामाणिकरण केले आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण दोन लाख 3,769 कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे बँकानी पोर्टलवर अपलोड केले आहेत. यापैकी पहिल्या यादीत जिल्ह्यातील 37 हजार 164 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 36 हजार 494 लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण केले तर 550 शेतकरी बांधवांची आधार प्रमाणीकरण बाकी आहे.

केवायसी केलेल्या 32,458 लाभार्थ्यांना 19 कोटी 92 हजार रुपये मिळाले आहेत.  यातील आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले असून ज्यांच प्रमाणीकरण झाल आहे मात्र अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे.

तसेच, दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची यादी देखील लवकरच प्रकाशित होणार आहे. राज्यात ग्रामपंचायता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुदानाची दुसरी यादी प्रसिद्ध झालेली नसल्याचे जाणकार सांगत आहेत. मात्र लवकरच या अनुदानाची दुसरी यादी पोर्टलवर अपलोड होणार असून त्यांना देखील अनुदानाचा लाभ अनुज्ञेय केला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण एक लाख 66 हजार 605 शेतकरी बांधव दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe