50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय देखील त्या वेळी तत्कालीन सरकारने घेतला. मध्यंतरी महाराष्ट्र समवेत संपूर्ण देशात कोरोना आजार आला. यामुळे शासनाच्या (Maharashtra Government) तिजोरीत खडखडाट पाहायला मिळाला.
परिणामी प्रोत्साहनपर अनुदान हे लांबणीवर पडले. या महाभयंकर आजारानंतर जेव्हा मानवी जीवन पूर्वपदावर आले त्यावेळी देखील या अनुदानाचा मुद्दा ऐरणीवर होता. मात्र, राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी सत्ताबदल झाला. आता नवोदित शिंदे सरकारने देखील भूतपूर्व महाविकास आघाडी सरकारचा निर्णय जसाच तसा ठेवला आहे.
म्हणजे 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षापैकी किमान दोन वर्ष कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान आता या अनुदानासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या देखील सार्वजनिक केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या यादीत शेतकरी बांधवांना आपले नाव कशा पद्धतीने चेक करता येणार आहे याविषयी बहुमूल्य माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत नाव कसं बघायचं बर…!
शेतकरी मित्रांनो आपणांस 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान नाच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे यादीत आपले नाव बघायचं असेल तर आपणास जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.
कारण की अनुदानाच्या याद्या या संबंधित बँकेत तसेच सीएससी पोर्टल वर अपलोड करण्यात आल्या आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सीएससी पोर्टलवर सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकर्यांच्या याद्या अपलोड करण्यात आले आहेत.
इतर राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांच्या याद्या दुसऱ्या फेरीपासून सार्वजनिक केल्या जाणार आहेत. मित्रांनो शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीने सीएससी पोर्टलला याद्या पाहता येणार नाहीत, त्यासाठी शेतकरी बांधवांना आपले सरकार सेवा केंद्र चालककडे जावे लागणार आहे. सीएससी पोर्टलला फक्त सीएससी चालक यांनाच लॉगिन घेता येत असतो.
यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांना सीएससी सेंटर वर जावे लागणार आहे. दरम्यान आज आपण सीएससी सेंटरवर शेतकरी बांधव कशा पद्धतीने आधार कार्डचा उपयोग करून आपले यादीत नाव चेक करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.
- प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम सीएससी पोर्टलला लॉगिन घ्यावे लागणार आहे.
- लॉगिन घेतल्यानंतर त्या ठिकाणी दिसत असलेल्या सर्च या ऑप्शन मध्ये ‘महात्मा’ हे नाव सर्च करायचं आहे.
- यानंतर त्या ठिकाणी एक लिंक दिसेल ज्यावर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना असं नाव असेल तेथे क्लिक करा.
- यानंतर शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना या पोर्टलवर नेल जाईल. या ठिकाणी आधार ऑथेटीकेशन लिस्ट डाउनलोड (Adhar Authentication List) हा ऑप्शन दिसणार आहे.
- त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी समोर येणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधव आपल्या जिल्ह्यातील यादी डाऊनलोड करून त्यामध्ये आपले नाव शोधू शकणार आहेत.
- यादीमध्ये दिलेली माहिती मध्ये जर काही तफावत असेल तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर संबंधित बँकेत जाव लागणार आहे.
- आणि जर यथायोग्य असेल तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर केवायसी करावी लागणार आहे. यासाठी शेतकरी बांधव बँकेत तसेच सीएससी पोर्टलवर केवायसी करू शकणार आहेत.