Successful farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील आपल्या देशात शेती (Farming) हा एक कायम आव्हानात्मक व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व बघायला मिळाले आहे.
शेती व्यवसायात अजूनही अपेक्षित अशी महिलांची भागीदारी बघायला मिळतं नाही. म्हणजे शेती आणि फलोत्पादनासारख्या कामांमध्ये आजही पुरुषांचा प्रभाव अधिक बघायला मिळतं आहे, पण बदलत्या काळानुसार आता अनेक महिला शेती व्यवसायात पदार्पण करू लागले आहेत.

महिला आता शेती आणि बागायती क्षेत्रात यशाचे नवनवे विक्रम लिहित आहेत. एवढेच नाही महिला (Successful Women Farmer) आता शेती व्यवसायात पुरुषांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत असल्याचे बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातही एका महिला शेतकऱ्याने पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवली आहे.
जिल्ह्याच्या बसरेहर विकास ब्लॉक अंतर्गत अड्डा नवली गावातील रहिवासी शेतकरी मोना कुशवाहा या महिला शेतकऱ्याने भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) लागवड करून चांगले उत्पन्न (Farmers Income) कमवण्याची किमया साधली आहे. जिने आपल्या पतीच्या साथीने बेमोसमी भाजीपाल्याचे उत्पादन (Vegetable Production) घेऊन दाखवले आहे.
परिणामी त्यांच्या या यशाने त्यांच्या कुटुंबाचे नशीब पूर्णतः पालटले असून आज ते सुखी आयुष्य जगत आहेत. महिला शेतकरी मोना कुशवाह आज स्वत:साठी आणि पंचक्रोशीतील इतर महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.
त्याचवेळी, तिच्या या यशानंतर, मोठ्या संख्येने आजूबाजूच्या परिसरातील महिला तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि ती आता इतर महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी झडत असल्याचे बघायला मिळतं आहे.
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या संयुक्त विद्यमाने बेमोसमी भाजीपाल्याची लागवड सुरू
अवकाळी भाजीपाला लागवडीतून कुटुंबाचे नशीब बदलण्याची कहाणी लिहिणारी मोना कुशवाह सांगते की, 2013 मध्ये लग्न झाल्यानंतर ती या घरात आली. पदवीधर असलेल्या मोना सांगतात की, तेव्हा तिचा नवरा 4 बिघा जमिनीवर गहू आणि भात पिकवायचा.
ज्यातून वर्षाला जेमतेम 60 ते 70 हजार रुपये मिळत होते. मोना सांगते की, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान योजनेच्या अंमलबजावणीसाठी एके दिवशी अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या गावात आली.
ज्यांच्याकडून तिने माहिती गोळा केली आणि तिने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात सहभागी होऊन प्रशिक्षण घेतले. मोना सांगते की, यानंतर तिने तिच्या पतीसोबत त्यांच्या 4 बिघा शेतात काकडी, टरबूज, कारले यांसारख्या ऑफ सीझन भाज्या पिकवायला सुरुवात केली.
वर्षाला 4 लाखांची कमाई
आपल्या यशाच्या प्रवासाविषयी माहिती देताना मोना कुशवाह सांगतात की, प्रथम त्यांनी मल्चिंग बेडचा वापर करून काकडीची शेती सुरु केली. यामध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा टरबूज, मुळा इत्यादी भाजीपालावर्गीय पिकांची शेती सुरु केली. मोना सांगते की, आता ती ऑफ सीझन भाजीपाला उत्पादन करून वर्षाला चार लाख रुपयांहून अधिक नफा कमवत आहे.
50 महिलांना रोजगार आणि 40 महिला गटात सामील
महिला शेतकरी मोना कुशवाह सांगतात की, राष्ट्रीय उपजीविका अभियानाशी संलग्न झाल्यानंतर त्याना मोठा फायदा झाला. आता त्या इतर महिलांना देखील हाताला काम देत आहेत. मोना यांनी आत्तापर्यंत 50 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
यामुळे या महिला शेतकऱ्यांच्या जीवनात देखील मोठा बदल झाला असून आता या महिला शेतकरी आपले जीवन आनंदी जगत आहेत. याशिवाय त्यांनी एक बचत गट स्थापन केला आहे, ज्यामध्ये 40 महिला जोडल्या गेल्या आहेत. जिल्हास्तरीय प्रदर्शनात स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी सहभाग घेतला असून तीनदा जिल्हास्तरीय पुरस्कारही मिळाले असल्याचे मोना सांगते.
ती सांगते की, तिने एका महिला शेतकऱ्याला स्ट्रॉबेरीच्या शेतीशी जोडले होते, जी आज चांगला नफा कमवत आहे. निश्चितचं या महिला शेतकऱ्याने शेती व्यवसायात मिळवलेले हे यश नेत्रदीपक असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे सिद्ध होणार आहे.