Cow Rearing: आपला भारत देश हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या की शेती (Farming) व शेतीशी संबंधित उद्योग धंद्यात गुंतलेली आहे. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणू शकतो.
देशातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाणारे पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत आहेत. आपल्या देशात पशुपालनात गाईचे पालन सर्वाधिक केले जाते.
गाईचे पालन (Cow Farming) मुख्यता दूध उत्पादनासाठी केले जात असते. गाय पालनातून शेतकरी बांधवांना दुधाचे तसेच शेणखताचे देखील उत्पादन मिळत असते, म्हणजेच गाईचे पालन शेतकरी बांधवांना (Farmer) दुहेरी फायदा देणारे ठरते.
गाय पालनात यशस्वी होण्यासाठी आणि यातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोक पशुपालक शेतकरी बांधवांना गाईच्या प्रगत जातींचे पालन करण्याचा सल्ला देत असतात. त्यांच्या प्रगत जातीचे पालन करून पशुपालक शेतकरी बांधव निश्चितच चांगला नफा गाय पालनातून मिळवू शकतात.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे गाय पालन मुख्यतः दूध उत्पादनासाठी केले जाते यामुळे पशुपालक शेतकरी बांधवांनी जास्त दूध देणाऱ्या गाईच्या जातींचे पालन करावे असा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका विशेष गाईच्या जाती (cow breed) विषयी माहिती घेऊन हजार झालो आहोत.
आज आपण गाईच्या सर्वाधिक दूध देणाऱ्या जाती विषयी जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या गाईचे पालन भारतात मोठ्या प्रमाणात केले जात असून भारतीय हवामान या गाईला मानवते. मित्रांनो आम्ही ज्या गाईच्या जाती बद्दल बोलत आहोत ती आहे राठी गाय (rathi cow). राठी एक देसी गाय असून या गाईचे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया राठी गाई विषयी काही महत्त्वाच्या बाबी.
कमी आहार उच्च दूध उत्पादन क्षमता
राठी ही एक गाईची प्रगत जात आहे. खरं पाहता गाईची ही जात देशी जात म्हणून ओळखली जाते. या जातीचे भारतात मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. या जातीचे भारतातील राजस्थान व पंजाब राज्यात पालन केले जाते. भारतातील इतरही राज्यात या जातीच्या गाईं बघायला मिळतात. मित्रांनो राजस्थान व आजूबाजूच्या राज्यात या गाईला कामधेनु म्हणून ओळखले जाते.
शेतकऱ्यांच्या मते, गाईची या देशी जातीची दूध देण्याची क्षमता ही इतर जातीपेक्षा अधिक असल्याने या जातीला कामधेनु म्हणून ओळखले जाते. या गाईच्या विशेषता या साहिवाल गाई सारख्याच असतात. जाणकार लोकांच्या मते, गाईची ही जात कमी आहारात उच्च दूध देण्यास सक्षम आहे. या गाईची दूध देण्याची क्षमता 1060 ते 2810 लिटर पर्यंत असू शकते.
अर्थातच प्रतिदिन या गाई आठ ते दहा लिटर दूध देत असतात. मात्र जर या गाईना चांगला आणि पौष्टिक आहार दिला गेला तर या जातीच्या गाई पासून 30 लिटरपर्यंत दूध मिळवले जाऊ शकते. निश्चितच आपल्या दूध उत्पादन क्षमतेमुळे ही गाय शेतकऱ्यांना लाखों रुपये उत्पन्न कमवून देऊ शकते.