नोकरीला रामराम ठोकून ‘या’ तरुणाने उभी केली शेतकरी उत्पादक कंपनी आणि आज आहे 71 लाखांचा टर्नओव्हर; वाचा या तरुणाची यशोगाथा

Published on -

तरुणाई म्हटले म्हणजे कायम अंगात असणारा सळसळता उत्साह, काहीतरी नवीन करण्याची उर्मी आणि मनात एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व धाडस यांचा मनोमिलाफ असतो. तरुणाई ज्या क्षेत्रामध्ये पडते त्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन बदल असे घडत असतात व एक क्रांतीच किंवा एक बदलांचे वारे संबंधी क्षेत्रामध्ये वाहायला सुरुवात होते.

अगदी याच पद्धतीचे बदल आपल्याला आता काही वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये दिसून येत आहे. कारण शेती व्यवसायाकडे आता बऱ्याच तरुणांनी पाऊल ठेवल्यामुळे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान तर शेतीमध्ये आणले. परंतु पारंपारिक पिकांना तिलांजली देत विविध प्रकारच्या फळबागा आणि भाजीपाला पिकांची लागवडीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले.

याव्यतिरिक्त शेती क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन संकल्पना देखील राबवायला सुरुवात केली. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्ह्यात असलेल्या पहाडी गावचे धर्मेंद्र मौर्या दुबरा या तरुण शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून काही कालावधीसाठी नोकरी केली व नंतर नोकरी सोडून शेतीत परतला व यशाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

 धर्मेंद्र दुबरा यांनी शेतकरी उत्पादक कंपनी अर्थात फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून केली आर्थिक प्रगती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील मिर्जापुर जिल्ह्यात असलेल्या पहाडी या गावचे धर्मेंद्र मौर्य दुबरा या तरुण शेतकऱ्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केले व इतर तरुणांप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कालावधी करिता नोकरी करायला सुरुवात केली. परंतु या नोकरीमध्ये त्यांना खूप कमी पगार मिळत होता.

तसेच मनामध्ये काहीतरी व्यवसाय करावा हे सुरू असल्याने त्यांनी शेती व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले. परंतु शेतीमध्ये येताना पारंपारिक पद्धतीने शेती न करता काहीतरी नवीन संकल्पना त्यामध्ये आणाव्यात या संकल्पनेतून प्रयत्न सुरू केले व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून 2022 मध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. जर आपण आज या कंपनीची वाटचाल पाहिली तर त्यांच्या या कंपनीशी बाराशे पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेलेले आहेत.

 मिलेट्स वर आधारित प्रक्रिया उद्योगावर आहे या कंपनीचा भर

धर्मेंद्र दुबरा यांनी उभी केलेली शेतकरी उत्पादक कंपनी मिलेट्सवर आधारित प्रक्रिया उद्योगात आपले बस्तान बसवत असून ज्वारी आणि बाजरी यासारख्या धान्यापासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करून त्यांची विक्री केली जात आहे. त्यामध्ये अशा मिलेट्स पासून बिस्किट किंवा अनेक प्रकारचे नमकीन,

मल्टीग्रेन पीठ आणि हरभरा डाळ यासारखे उत्पादने या कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केले जात असून त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यांची ही कंपनी शेतकऱ्यांकडून बाजरीची खरेदी करते व वाराणसी तसेच दिल्ली इत्यादी राज्यांमध्ये त्या बाजरीचा पुरवठा करते.इतकेच नाही तर या बाजरी पासून अनेक उत्पादने तयार करून देश-विदेशात ते निर्यात केले जात आहेत.

2022 पासून या कंपनीची सुरुवात झाली व आतापर्यंत या कंपनीसोबत एकूण 1238 शेअरहोल्डर शेतकरी जोडले गेले आहेत. दोन वर्षांमध्ये अखंड परिश्रम घेऊन या कंपनीने हे यश मिळवलेले आहे.

महत्त्वाचे म्हणजे धर्मेंद्र यांच्या या कंपनीमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला देखील मदत झाली आहे. आता जर या कंपनीची वार्षिक उलाढाल पाहिली तर ती 71 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे व या वर्षापर्यंत ही उलाढाल एक कोटीपर्यंत वाढवण्याचा मानस असल्याचे देखील धर्मेंद्र दुबरा यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News