Electric Tractor: आता सरकार इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर देणार अनुदान! वाचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Ajay Patil
Published:
electric tractor subsidy

Electric Tractor:- आपण देशामध्ये पाहतो की शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांवर सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. याच पद्धतीने आता कृषी यंत्रांवर जे काही अनुदान दिले जाते त्यासोबत  आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर देखील चांगल्या पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. कारण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान मिळाल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर कमी किमतीत खरेदी करणे शक्य होणार आहे  व या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणाला देखील चालना मिळेल हे मात्र नक्की. केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत की फेम 3 अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व इतर इलेक्ट्रिक वाहनांना अनुदानाच्या कक्षेत आणणे व याकरिता अवजड उद्योग मंत्रालयाने अनुदानाचा हा प्रस्ताव तयार केलेला आहे.

 शेतकऱ्यांना किती होईल फायदा?

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. अवजड इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा 90 टक्के उत्पादन खर्च कमी करू शकतो. त्यामुळे छोटे म्हणजेच अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान मिळाल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना कमी पैशात ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होणार आहे व याचा वापर शेतीमध्ये करता येणार आहे. जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर 80 ते 90 टक्के शेतकऱ्यांची ट्रॅक्टरची गरज ही मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण होते.

त्यामुळे मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चच नाही तर कमीत कमी गुंतवणुकीत शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकणार आहेत. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक गरजा पूर्ण करता येऊ शकतात व फळबाग लागवडीमध्ये किंवा फळ शेतीमध्ये देखील या पद्धतीचे ट्रॅक्टर खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.

 किती मिळेल इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर अनुदान?

इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर मिळणाऱ्या अनुदानाचा विचार केला तर इतर वाहनांसारख्या यावर देखील 20 ते 25 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. त्यामुळे हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्च कमी होऊ शकतो. कारण जर आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा विचार केला तर याचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर यामध्ये बॅटरीची किंमत खूप जास्त असते.

परंतु अनुदानामुळे जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा उत्पादन खर्च 20 ते 25 टक्क्यांनी कमी झाला तर शेतकरी कमी खर्चात हे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. म्हणजेच समजा पाच लाख रुपये इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची मूळ किंमत असेल  तर हे ट्रॅक्टर तुम्हाला तीन लाख 75 हजार ते चार लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. म्हणजेच यामुळे एक ते सव्वा लाख रुपयांची बचत शेतकऱ्यांची होऊ शकते.

 भारतात सर्वात जास्त विकले जाणारे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये देखील अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर उठले जातात व त्यामध्ये जर विचार केला तर ऑटोनेक्स्ट X20H4, एचएवी 50 एस 1, सेलेस्टीयल 27 एचपी, सोनालिका टायगर इलेक्ट्रिक, ऑटोनेक्स्ट X45H2, एएचवी 45 एस 1, एचएवी 45 एस 1( सेलेस्टीयल 35 एचपी ) आणि सेलेस्टीयल 55 एचपी हे ट्रॅक्टर प्रसिद्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe