Goat Rearing: भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेती (Farming) समवेत शेती पूरक व्यवसाय (Agri Business) म्हणून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्याप्रमाणात केले जात आहे. शेळीपालन (Goat Farming) आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात करत आहेत.
शेळी पालन कमी जागेत आणि कमी खर्चात सुरु करता येत असल्याने अनेक शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसायाकडे आता मोठ्या प्रमाणात वळत आहेत. शेळीपालन व्यवसाय आता व्यावसायिक स्तरावर केला जात आहे. एकेकाळी दुय्यम समजला जाणारा हा व्यवसाय आता मुख्य व्यवसायाची जागा घेऊ पाहत आहे.
अशा परिस्थितीत जाणकार लोक शेतकरी बांधवांना प्रगत शेळीच्या जातींचे पालन करण्याचा सल्ला देतात. आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेळीच्या एका सुधारित जातीची (Goat Breed) माहिती घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आज आपण जमुनापुरी (Jamunapuri Goat Breed) या शेळीच्या एका प्रगत जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया जमुनापुरी शेळीच्या जाती विषयी बहुमूल्य माहिती.
जमुनापारी शेळीची वैशिष्ट्ये:
- मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की जमनापुरी शेळीची ही प्रगत जात मुख्यता उत्तर प्रदेश राज्यात आढळते. मात्र असे असले तरी देशातील इतरही राज्यांत या शेळीचा वावर आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील या शेळीचे संगोपन शेतकरी बांधव करत आहेत.
- या जातीच्या शेळ्या पाईड किंवा वेगवेगळ्या रंगाच्या असू शकतात.
- या जातीच्या शेळ्यांच्या तोंडावर किंवा घशावर सहसा पांढरे पण तपकिरी ठिपके असतात. पांढऱ्या जमुनापरी शेळ्याही दिसतात.
- या जातीच्या शेळ्यांचे कान 20-25 सेमी लांब असतात.
- लहान शिंगे, मोठी कासे, लांब चुचुक ही जमुनापरी शेळ्यांची वैशिष्ट्ये आहेत.
- या शेळ्या मोठ्या आहेत. लांब केस मागील पट्ट्यांच्या खालच्या बाजूस लटकतात.
- या शेळी जातीशी संबंधित प्रौढ नर शेळीचे वजन 68-90 किलो आणि मादी शेळीचे वजन 45-65 किलोपर्यंत असते.
- जमुनापरी नावाच्या शेळ्यांची ही जात दूध आणि मांस दोन्ही साठी मोठ्या प्रमाणात पाळली जाते.
- जमनापुरी शेळी एका दिवसात एक लिटर दूध देण्यास सक्षम असते. या जातीच्या शेळीच्या दुधात वसा म्हणजेच फॅट चार ते पाच टक्के आढळतो. यामुळे शेळी पालन करणारे शेतकरी या जातीच्या शेळीच्या संगोपणास विशेष प्राधान्य दाखवतात.
- जमुनापुरी ही शेळीची जात एका वर्षात एकदा गाभण राहते आणि एकाचं करडाला जन्म देते.