Grape Variety: नाशिक जिल्ह्यातील कांबळे बंधूंनी आरा द्राक्ष वाणाची लागवड केली यशस्वी! मिळणार लाखो रुपयांचे उत्पन्न

Ajay Patil
Published:

Grape Variety:- महाराष्ट्रामध्ये जर आपण वेगवेगळ्या जिल्हानुसार विचार केला तर पिकांमध्ये देखील आपल्याला विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामध्ये नाशिक जिल्हा हा प्रामुख्याने कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोच व फळबागाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नाशिकची ओळख ही द्राक्ष पंढरी अशी आहे.

त्या खालोखाल डाळिंबाची लागवड देखील नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. खास करून जर आपण द्राक्षाचा विचार केला तर  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादनाचा बाबतीत फार मोठा हातखंडा असून मोठ्या प्रमाणावर द्राक्षांचे उत्पादन या ठिकाणी होते.

एवढेच नाही तर द्राक्षांच्या बाबतीत या ठिकाणचे शेतकरी कायम वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करताना आपल्याला दिसून येतात. याच आधारे जर आपण नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या कोणे या गावच्या भास्कर आणि दिनकर या कांबळे बंधूंचा विचार केला तर त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या मातीत आरा नावाच्या नव्या द्राक्ष वानांची लागवड यशस्वी केली आहे. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 नाशिकच्या कांबळे बंधूंनी आरा द्राक्षाची लागवड केली यशस्वी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या कोणे या गावचे दिनकर आणि भास्कर कांबळे या भावंडांकडे 26 एकर शेती आहे व या शेतीमध्ये ते गेल्या 15 ते 17 वर्षापासून द्राक्ष लागवड करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने 24 एकर क्षेत्रात ते थॉमसन या द्राक्ष वाणाची लागवड करत होते तर उरलेल्या दोन एकरमध्ये फ्लेम जातीची लागवड करत होते.

हे वाण देखील चांगले होते असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु कालांतराने द्राक्षांच्या घडाला तडे जाण्याचे प्रकार या वानांमध्ये वाढले. दरम्यानच्या कालावधीत नासिक जवळ असलेल्या मोहाडी येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीशी कांबळे बंधू जोडले गेले व 2022 मध्ये सह्याद्री फार्मच्या माध्यमातून त्यांनी दोन एकर क्षेत्रात आरा या वाणाच्या आरा रेड सिलेक्शन पाच आणि आरा रेड सिलेक्शन सहा या दोन द्राक्ष वानांची लागवड केली.

साधारणपणे सप्टेंबर 2023 मध्ये त्यांनी बागेची छाटणी केली व जानेवारी 2024 मध्ये या द्राक्ष वानांपासून त्यांना उत्पादन मिळाले म्हणजेच हार्वेस्टिंग करण्यात आली. योग्य नियोजन करून त्यांनी बाग व्यवस्थित रित्या फुलवली व एकरी एक ते दीड लाख पर्यंत खर्च केला.

विशेष म्हणजे त्यांनी पिकवलेल्या या द्राक्षांना व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन चांगल्या दराने खरेदी केली. त्यामुळे कांबळे बंधूंना या वानांपासून आता लाखो रुपयांचे उत्पादन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. साधारणपणे दोन एकर क्षेत्रातील या आरा द्राक्षाच्या वानांपासून साधारणपणे सात ते आठ टन उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

 या वाणांचा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला लिलाव

या दोन्ही वाणांच्या द्राक्षांचा लिलाव हा ऑनलाईन पद्धतीने पार पडला व यामध्ये आराच्या या रंगीत असलेल्या दोन वानांपैकी एका वाणाला दोनशे वीस रुपये प्रति किलो तर दुसऱ्या वाणा ला २६० रुपयांचा दर मिळाला. ऑनलाइन झालेल्या लिलावामध्ये आरा रेड सिलेक्शन पाच द्राक्षाच्या चार किलो 800 ग्राम वजनाच्या पेटीला 1250 रुपये तर आरा रेड सिलेक्शन 6 या वाणाच्या द्राक्ष पेटीला एक हजार साठ रुपये म्हणजेच प्रति किलो दोनशे वीस रुपये इतका दर मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe