उसाची लागवड रोपांच्या माध्यमातून करायची आहे तर कशी कराल? एका एकरमध्ये किती रोपांची लागवड करावी?

उसाची लागवड पाहिली तर टिपरी किंवा एक, दोन डोळा अशा पद्धतीने सध्या केली जाते. यामध्ये अधिक उत्पादन मिळावे याकरिता दोन टिपऱ्यांमध्ये एक फूट अंतराची शिफारस असते. परंतु शेतकरी प्रामुख्याने टक्कर पद्धत म्हणजेच टिपरे एकमेकांना जोडून लागवड करतात. या पद्धतीमध्ये बेणे जास्त लागते व खर्च देखील जास्त होतो.

Published on -

Sugarcane Crop Cultivation:- शेतीमध्ये आता अगोदरच्या ज्या काही परंपरागत शेतीच्या पद्धती किंवा पीक लागवडीच्या ज्या काही पद्धती होत्या त्यामध्ये आता पूर्णपणे बदल करण्यात आलेला असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने लागवड पद्धतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीला चालना मिळाली असून आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे.

परंपरागत शेती पद्धत आणि परंपरागत पिके आता काळाच्या ओघात मागे पडली असून त्यांची जागा आता भाजीपाला तसेच फळ पिके व लागवडीच्या अत्याधुनिक अशा पद्धतीने घेतलेली आहे. या अनुषंगाने जर आपण ऊस पिकाचा विचार केला तर यामध्ये देखील आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असून लागवड पद्धतीत देखील बदल करताना दिसून येत आहे.

उसाची लागवड पाहिली तर टिपरी किंवा एक, दोन डोळा अशा पद्धतीने सध्या केली जाते. यामध्ये अधिक उत्पादन मिळावे याकरिता दोन टिपऱ्यांमध्ये एक फूट अंतराची शिफारस असते. परंतु शेतकरी प्रामुख्याने टक्कर पद्धत म्हणजेच टिपरे एकमेकांना जोडून लागवड करतात. या पद्धतीमध्ये बेणे जास्त लागते व खर्च देखील जास्त होतो.

तसेच लागवडीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाढला असल्यामुळे या पद्धती आता सोडून नवीन पद्धतीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून उसाचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करून रोपांची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.

टिपरी पद्धतीचे लागवडीचे तोटे पाहता त्या तुलनेत रोपांची लागवड खूप फायद्याची राहील. निरोगी व उत्तम प्रतीची उसाची रोपे असतील तर घरच्या घरी देखील शेतकऱ्यांना उसाची लागवड करता येणे शक्य आहे. तसेच दर्जेदार व निरोगी अशा रोपांची निर्मिती शेतकरी स्वतः देखील करू शकतात.

ऊस रोपांची लागवड करताना ठेवायचे अंतर व एकरी रोपांची संख्या
उसाची लागवड जर रोप पद्धतीने करायचे असेल तर पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड करणे फायद्याचे आहे. पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड केली तर एकरी साधारणपणे 4356 रोपे बसतात.त्याशिवाय पाच बाय अडीच फूट अंतरावर लागवड केली तर साधारणपणे एका एकर मध्ये 3484 रोपांची लागवड करता येते

व पाच बाय तीन फुट अंतरावर लागवड केली तर साधारणपणे एका एकर मध्ये 2900 रोपे लावणी शक्य होते. या पद्धतीमध्ये ऊस लागवडीचे अंतर जितके जास्त तितके उसाचे वजन वाढण्यास मदत होते. तसेच उसाची बांधणी पर्यंत फुटव्यांची संख्या मर्यादित राहते व सूर्यप्रकाश तसेच मोकळी जागा जास्त मिळाल्यामुळे नक्कीच उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होतो.

जास्तीत जास्त प्रमाणात फुटव्यांचे रूपांतर उसात होते व पुरवली गेलेली अन्नद्रव्य मोजक्याच उसाला मिळाल्यामुळे उसाचे वजन देखील वाढते व कारखान्याला वजनदार ऊस आपल्याला पुरवता येतो.

कशा पद्धतीने करतात उसाची रोपांच्या माध्यमातून लागवड?
1- ऊस लागवड अगोदर शेताची चांगल्या प्रकारे मशागत केल्यानंतर साध्या पद्धतीने पाच फूट बाय पाच फूट अंतरावर मध्यम खोलीचे सरी टाकून घ्यावी.

2- सरीमध्ये कुजलेले शेणखत व कंपोस्ट खत टाकावे.

3- एका एकरकरिता प्रत्येकी तीन किलो अझेटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू चांगले मिसळून घ्यावे.

4- ठिबक सिंचन पद्धतीने लागवड करत असाल तर पाच फुट अंतरावर 16 ते 18mm जाडीची उपनळी टाकावी.

5- जमीन जर हलकी ते मध्यम असेल तर 40 cm अंतरावर एका तासात चार लिटर पाणी पुरवू शकेल असा इनलाईन ड्रीपर असावा.

6- रोपांची लागवड करण्याअगोदर ठिबक सिंचन सुरू करून घ्यावे व या माध्यमातून जमीन जर हलकी ते मध्यम असेल तर हे काय करायला 50 हजार लिटर पाणी व जमीनदार भारी असेल तर 44 हजार लिटर पाणी द्यावे.

7- त्यानंतर वाफसा येईल तेव्हा कुदळीने दोन फुट किंवा अडीच फुट किंवा तीन फूट अंतरावर रोपांची लागवड करून घ्यावी. त्यानंतर दिवसातून एक वेळा दोन तास ठिबक सिंचन प्रणाली चालू ठेवावी व योग्य पाणी व्यवस्थापन करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe