Hydroponic Farming : अरे वा, माती विना फळपिकांची शेती करता येणार! यामुळे खर्च होणार कमी आणि उत्पादन वाढणार

hydroponic farming

Hydroponic Farming : संपूर्ण भारतवर्षात लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोकसंख्या मोठया गतीने वाढत आहे. यामुळे आता अन्नाचा पुरवठा केवळ शेतीजमिनीत शेती (Farming) करून भागवता येणे अशक्य बनले आहे.

यामुळे शेती व्यवसायात (Agriculture) मोठा बदल केला जात आहे. आता मातीविना शेती करण्याचे तंत्र (Farming Technology) देखील बाजारात दाखल झाले आहेत. यामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा (Hydroponics Techniques) देखील समावेश केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) कमी खर्चात अधिक आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळणार आहे.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी बांधवांना कमी खर्चात अधिक उत्पादन (Farmer Income) मिळणार आहे शिवाय हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये पिकांना रोग लागण्याची शक्यता कमी असल्याने दर्जेदार शेतमालाची देखील निर्मिती होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की, हायड्रोपोनिक्स शेती संरक्षित संरचनांमध्ये केली जाते, ज्यासाठी मातीची किंवा शेतजमिनीची अजिबात आवश्यकता नसते.

या शेतीच्या आधुनिक तंत्रात पाणी आणि पोषक तत्वांचा वापर करून फळे आणि भाज्या पिकवल्या जातात. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, पूर्वी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित होते. मात्र काळाच्या ओघात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल झाला असून आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञान शहरात देखील मोठ्या प्रमाणात प्रचलित होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता बहुतेक लोक फळ आणि भाजीपाला उत्पादन करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरात आता घरामध्ये आणि बाल्कनीमध्ये भाजीपाला पिकांची आणि फळबाग पिकांची लागवड केली जात आहे.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाते फळांची लागवड

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून भाज्यांचे चांगले उत्पादन घेतले जात आहे, हे आपणास सर्वांना माहीतच आहे. मात्र आता या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वादिष्ट आणि गोड फळेही पिकवता येतात. या फळांमध्ये स्ट्रॉबेरी, बेरी, द्राक्षे आणि खरबूज यां फळांचा समावेश होतो. मित्रांनो आम्ही या आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ही चारही हंगामी फळे आहेत, ज्यांच्या लागवडीसाठी वेगवेगळे हवामान आवश्यक आहे.

परंतु हायड्रोपोनिक्सच्या मदतीने आपण या फळांचे दर्जेदार उत्पादन हंगामाच्या मर्यादेशिवाय मिळवू शकतो. म्हणजे या फळपिकांची लागवड हायड्रोपोनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने केव्हाही केली जाऊ शकते. ही अशी फळे आहेत, ज्यांची मागणीही वर्षभर राहते. अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक्स रचनेत ही फळे पिकवून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

हायड्रोपोनिक्सची वैशिष्ट्ये तर जाणून घ्या 

हायड्रोपोनिक्स शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या टेक्निकने फळे आणि भाजीपाला उत्पादीत करण्यासाठी माती किंवा हवामानाच्या बदलाचा पिकावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मातीविना कोणत्याही हंगामात हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाजीपाला आणि फळे लागवड करून चांगले उत्पादन घेता येते.

खरं तर, हायड्रोपोनिक्स स्ट्रक्चर्समध्ये, मातीऐवजी पीव्हीसी पाईप्समधून पाणी वाहते आणि या पाण्यात पोषक घटक जोडले जातात, जे थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचतात आणि फळे आणि भाज्यांचे उत्पादन वाढवतात. दरम्यान, हायड्रोपोनिक्स रचनेचे तापमानही हंगामी फळे आणि भाज्यांनुसार नियंत्रित करता येते.

माती ऐवजी पाण्याचा होतो प्रभावी वापर

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि यापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पाणी आणि पोषक घटक आवश्यक असतात. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे पिकांची शेतजमिनीत किंवा मातीत लागवड केल्यावर माती आणि खतातून पोषक तत्वांचा पुरवठा केला जातो. मात्र हायड्रोपोनिक्समध्ये मातीची अजिबात गरज नसते. येथे मातीऐवजी खडे आणि कोकोपीटचा वापर केला जातो, जेणेकरून मातीसारखे वातावरण तयार होईल.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास 90% पाण्याची होते बचत

हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये मातीच्या शेतीच्या तुलनेत पाण्याची खूप बचत होते, कारण या तंत्रात पाण्याचा पुनर्वापर केला जातो. या तंत्रज्ञानात पाण्याच्या माध्यमातून झाडांची वाढ झपाट्याने होते. त्याचबरोबर या तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य शेतीच्या तुलनेत 2 ते 8 पट अधिक दर्जेदार उत्पादनही कमी वेळात घेता येते.

या तंत्रज्ञानात कीटक रोगाचा धोका राहत नाही बर 

अर्थातच, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे एक प्रकारचे सेटअप असते जे की सर्व बाजूंनी झाकलेले असते, ज्यामध्ये बाह्य कीटक आणि पतंग प्रवेश करू शकत नाहीत. त्याच वेळी, या तंत्रात वापरलेले पाणी देखील पुन्हा पुन्हा वापरले जाते. ज्यामुळे रोगांची शक्यता देखील संपते. तज्ज्ञांच्या मते, पिकांमध्ये बहुतांश कीड-रोग जमिनीच्या कमतरतेमुळे पसरतात आणि हायड्रोपोनिक्समध्ये मातीचा वापर आणि बाहेरील हवेचा प्रवेश देखील शक्य होत नाही, त्यामुळे कीटकनाशकांचा खर्चही वाचतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe