Pm Kisan Scheme:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि इतर योजनांपेक्षा सर्वात जास्त यशस्वी झालेली योजना म्हणून ओळखली जाते. आपल्याला माहित आहेच की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन टप्प्यात विभागून केली जाते म्हणजेच एका टप्प्यात दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतात.
28 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जारी केला. या योजनेची 21 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.

अजून बरेच शेतकरी असे असू शकतात की त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे दोन हजार रुपये पोहोचले नसतील किंवा पोहोचले नाहीत व यामागे काही महत्त्वाची कारणे देखील असू शकतात. साधारणपणे या योजनेचा सोळावा हप्ता जर कुणाच्या खात्यावर जमा झाला नसेल तर त्यामागे काय कारणे असू शकतात? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.
पीएम किसान हप्ता खात्यात जमा न होण्याची कारणे
जर आपण या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर त्यामागील प्रमुख कारणे पाहिले तर ती केवायसी पूर्ण न करणे, डुप्लिकेट लाभार्थ्याचे नाव, शेतकरी लाभार्थी श्रेणीत नसतील असे नाकारलेले शेतकरी, या योजनेचा अर्ज भरताना चुकीचा आयएफएससी कोड,
शेतकऱ्यांचे बँक खाते बंद किंवा वैध नाही किंवा ते खाते हस्तांतरित किंवा गोठवलेले, लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अवैध बँक, पोस्ट ऑफिसचे नाव,
लाभार्थी खाते क्रमांक लाभार्थी कोड या योजनेची संबंधित नाही आणि खाते आणि आधार दोन्ही अवैध अशी कारणे यामागे असू शकतात. त्यामुळे जर तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे आले नसतील तर यापैकी एक कारण असू शकते.
पीएम किसान लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही या पद्धतीने तपासा
1- याकरिता सगळ्यात आधी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
2- या ठिकाणी गेल्यानंतर जे पेज उघडलेले असेल त्या पेजेच्या उजव्या कोपऱ्यातील लाभार्थी यादी टॅबवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
3- त्यानंतर ड्रॉप डाऊन मधून तपशील निवडावा लागेल जसे की यामध्ये राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव
4- त्यानंतर रिपोर्ट मिळवा या टॅब वर क्लिक करा.
5- त्यानंतर या योजनेची लाभार्थी यादी चा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.
हप्ता आला नसेल तर अशा प्रकारे नोंदवा तक्रार
जर या योजनेचा सोळावा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही या योजनेच्या हेल्पडेस्ककडे तक्रार करू शकतात. याकरिता तुम्ही
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606
पीएम किसान टोल फ्री क्रमांक 1800-115-526
ई–मेल आयडी [email protected] या मेल आयडीवर मेल पाठवून देखील तक्रार नोंदवता येते.