Jowar Farming : रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या ज्वारीची लागवड करा, बक्कळ कमाई होणार, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Jowar Farming : मित्रांनो येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रबी हंगामात गहू, हरभरा तसेच ज्वारी पिकाची (Jowar Crop) देखील मोठ्या प्रमाणात लागवड आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाऊ शकणाऱ्या आणि चांगले उत्पादन मिळवून देणाऱ्या ज्वारीच्या जाती (Jowar Variety) विषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकरी बांधवांनी (Farmer) त्या पिकाच्या सुधारित वाणाची पेरणी करणे आवश्यक राहणार आहे.

सुधारित जातींची लागवड किंवा पेरणी केल्यास शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात देखील बचत होते. शिवाय चांगले उत्पादन (Farmer Income) मिळत असल्याने शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते. अशा परिस्थितीत आज आपण ज्वारीच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेऊया.

रब्बी हंगामात उत्पादित केल्या जाऊ शकणाऱ्या ज्वारीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे :-

पीकेव्ही क्रांती (एकेएसव्ही १३ आर) :- रब्बी हंगामात या जातीची ज्वारीची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पिकेव्ही क्रांती ही जात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या कृषी विद्यापीठात विकसित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ही जात संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी करण्यासाठी अनुकूल आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही जात मध्यम कालावधी तयार होणारी अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीच्या ज्वारीचे कणीस आकाराने मोठी असते तसेच दाणे ठोकळ आणि चमकदार असतात. या जातिकडे मालदांडी 35-1 ला पर्यायी जात म्हणून पाहिले जाते.

या जातीच्या ज्वारीच्या भाकरी चवीला अप्रतिम असल्याने बाजारात मोठी मागणी असते. निश्चितच रब्बी हंगामात या जातीची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळणार आहे. ज्वारीच्या या जातीपासून हेक्‍टरी 30 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येत. या जातीचे ज्वारी पीक पेरणी केल्यानंतर 120 दिवसात उत्पादन देण्यास तयार होते. मळणीसाठी देखील ही जात सोपी आहे.

फुले रेवती :- रबी हंगामात पेरणी करण्यासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. बागायती क्षेत्रात पेरणी साठी हा वाण योग्य आहे. ही जात हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम असल्याने शेतकऱ्यांना या जातीच्या ज्वारी पिकातून चांगली कमाई होणार आहे.

ही जात पेरणी नंतर सरासरी 118 दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा आहे. कोरडवाहू क्षेत्रात लागवड केल्यास मध्यम जमिनीत या जातीच्या ज्वारी पिकाची पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय कोरडवाहू ठिकाणी 25 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास ही जात सक्षम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe