शेतकऱ्यांनो तयारीला लागा…! 25 हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची शेती सुरु करा ; लाखोत कमाई होणार

Ajay Patil
Published:
kalonji farming

Kalonji Farming : अलीकडे कमी कष्टात व कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणाऱ्या औषधी व मसाला वर्गीय पिकांची शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. ही पिके आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत बनत आहेत. कलोंजी हे देखील अशाच पिकांपैकी एक आहे.

कलोंजीमध्ये लहान बिया असतात. ज्याचा रंग काळा असतो. मसाल्यांबरोबरच औषध बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. कलोंजीच्या बियांमध्ये फॅट, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. हे वैद्यकीय उपचारांमध्ये वापरले जाते. कलोंजी बाजारात महागड्या दराने विकली जाते. हे नगदी पीक आहे. ज्याची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. 

कलोंजी लागवड सुरू करण्यापूर्वी याच्या शेतीतील काही महत्त्वाच्या गोष्टी-

कलोंजी हे नगदी पीक आहे, त्याची लागवड सुरू करण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांकडून योग्य माहिती घ्यावी. कलोंजी पिकासाठी जास्त सेंद्रिय माती लागते. त्यामुळे बियाणे पेरण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्या आणि सेंद्रिय पदार्थांची कमतरता दूर करा. कलोंजीच्या लागवडीसाठी प्रगत जातीचे रोग प्रतिरोधक बियाणे निवडा.

कलोंजी लागवडीतील काही महत्वाच्या बाबी 

कलोंजीसाठी वालुकामय, चिकणमाती, काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वात योग्य असते. जमिनीचे pH मूल्य 6 ते 7 च्या दरम्यान असावे. बियाणे पेरणी करताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. कलोंजीची झाडे थंड आणि उष्ण अशा दोन्ही हवामानात वाढतात.

कलोंजीला उगवण आणि वाढीच्या वेळी थंड तापमान आणि पिकण्याच्या वेळी उबदार तापमानाची आवश्यकता असते. कलोंजीची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान केली जाते. त्याच्या बियांना उगवण होण्यासाठी सामान्य तापमानाची आवश्यकता असते. दुसरीकडे, पिकण्याच्या कालावधीत पाऊस पडला तर पिकाची नासाडी होते.

शेतीची तयारी

कलोंजी बिया पेरण्यापूर्वी शेताची खोल नांगरणी करावी. यानंतर काही काळ शेत तसेच मोकळे सोडावे, जेणेकरून जमिनीला सूर्यप्रकाश मिळेल आणि घातक जीवाणू मरतील. यानंतर शेणखत जमिनीत चांगले मिसळावे. रोटाव्हेटरच्या साहाय्याने माती भुसभूशीत करावी.

बियाणे पेरणी कशी करावी 

कलोंजी बिया पेरण्यापूर्वी कॅप्टन, थिरम आणि बाविस्टिनची प्रक्रिया करा. त्याचे बियाणे फोकून किंवा टोकन पद्धतीने पेरले जाते. थेट पेरणीसाठी एक हेक्टरसाठी सुमारे 7 किलो बियाणे लागते. टोकन करतांना बियांमध्ये ३० सें.मी.चे अंतर ठेवावे व खोली २ सेमीपेक्षा जास्त ठेवू नये. टोकन पद्धतीने बियाणे पेरल्यास पिकाची काळजी चांगल्या पद्धतीने घेता येते. तुम्ही कलोजी बियाणे ऑनलाइन मागवू शकता किंवा स्थानिक कृषी सेवा केंद्र चालककडे संपर्क साधून बियाणे मिळवू शकता.

पाणी व्यवस्थापन

कलोंजी पिकाला भरपूर सिंचनाची गरज असते. साधारणपणे 5 ते 8 सिंचन केले जाते. सिंचनाचे प्रमाण पिकाच्या जातीवर अवलंबून असले तरी काही जातींना जास्त पाणी लागते, तर काही सामान्य सिंचनात चांगले उत्पादन देतात.

कलोंजीचे पीक साधारणपणे 130 ते 140 दिवसांत तयार होते. कलोंजी पिकातील मुळांसह झाडे उपटली जातात. यानंतर रोपे उन्हात वाळवली जातात. यानंतर, बिया किंवा धान्य काढण्यासाठी झाडांना लाकडावर मारले जाते आणि धान्य गोळा केले जाते.

तुम्हाला काय मिळते?

बाजारात कलोजीचा भाव 500 ते 600 प्रति किलो इतका आहे. म्हणजे 20 हजार ते 25 हजार रुपये प्रति क्विंटल दराने शेतीमाल बाजारात विकला जातो. साहजिकच या पिकाची शेती करून शेतकरी बांधव बक्कळ नफा कमवू शकणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe