Mansoon News: कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना अनमोल सल्ला, यावर्षी मान्सून समाधानकारक; मात्र जूनमध्ये पावसाचा पडणार खंड, म्हणुन……!

Ajay Patil
Published:
Maharashtra Farmer Will Get 70,000

Mansoon Update: मान्सूनचं (Mansoon) नुकत्याच काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दणक्यात आगमन (Mansoon In Kerala) झालं आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmers) मोठा प्रसन्न असल्याचे चित्र असून शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) नियोजन आखत आहे.

दरम्यान यंदा मान्सून समाधानकारक असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र असे असले तरी यंदा मान्सून वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याने जून मध्ये पावसाचा खंड बघायला मिळू शकतो.

यामुळे शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी (Kharif Crop) करण्यासाठी अजिबात घाई करू नये असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकऱ्यांना देत आहेत. राज्याचे कृषी मंत्री माननीय दादाजी दगडू भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी खरीप हंगामातील एका नियोजन बैठकीत शेतकऱ्यांना एक-दोन पाऊस पडताचं लगेच पेरणी करू नये असा सल्ला दिला होता.

निश्चितचं शेतकरी बांधवांनी समाधानकारक आणि पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना पेरणीसाठी आलेला हजारो रुपयांचा खर्च गमवावा लागू शकतो शिवाय पेरणीसाठी केलेली मेहनत देखील वाया जाऊ शकते आणि पुन्हा एकदा दुबार पेरणी करण्याची नामुष्की ओढावू शकते.

जून महिन्याचा तेवढा खंड सोडला तर या वर्षी मान्सून समाधानकारक राहणार असून या वर्षी मान्सून काळात पाऊस 101% पडणार आहे. एवढेच नाही तर यंदा दुष्काळी भागात देखील समाधानकारक पाऊस बघायला मिळणार आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने मंगळवारी मान्सून विषयक अंदाज सार्वजनिक केला. याआधी देखील भारतीय हवामान खात्याने अंदाज सार्वजनिक केला होता, आता पुन्हा एकदा विभागाने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला.

आता भारतीय हवामान विभागाच्या मते, देशात या मान्सून काळात 103 टक्के पावसाची दाट शक्यता आहे. मात्र जून महिन्यात आपल्या राज्यातील दक्षिण कोकण, राजधानी मुंबई, तसेच विदर्भातील पश्चिम मधील काही जिल्ह्यांत कमी पाऊस पडणार आहे.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात पावसाचा खंड बघायला मिळणार आहे. असा अंदाज अनेक हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण अधिक चांगले राहणार असल्याचे हवामान तज्ञांचे मत आहे. एकंदरीत काय शेतकरी बांधवांनी अपेक्षित असा पाऊस आल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये अन्यथा दुबार पेरणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe