Monsoon Update: यंदा मान्सून (Monsoon) हा 10 जून रोजी राज्यातील तळकोकणात म्हणजेच वेंगुर्ल्यात दाखल झाला. 10 जूनला वेंगुर्ल्यात दाखल झालेला मान्सून (Monsoon News) अवघ्या 24 तासात म्हणजेच 11 जून रोजी राजधानी मुंबईत पोहचला.
मुंबईत (Mumbai Weather Update) दाखल झाल्यानंतर लवकरच मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला होता. शेतकरी बांधवांना (Farmers) देखील मान्सून लवकरच संपूर्ण राज्य व्यापेल आणि राज्यात लवकरच पेरणीची कामे उरकतील असा अंदाज होता. मात्र 11 जूनला मुंबईत दाखल झालेला मान्सून त्यानंतर जणू काही गायबचं झाला. जूनचा पहिल्या पंधरावाड्यात महाराष्ट्रात मोसमी पाऊस (Rain) आलाच नाही.
हवामान तज्ञांच्या मते, मोसमी पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राजधानी मुंबईत देखील कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे मुंबई शहरातील तसेच उपनगरातील अनेक तलावांमधील पाणीसाठाही कमी झाला होता. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातही भूगर्भातील पाण्याचा साठा कमी झाला होता.
जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि आता मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची देखील नोंद करण्यात येत आहे. सोमवारी देखील राजधानी मुंबईतील अनेक भागात ढगाळ वातावरण होते आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद देखील झाली. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, मंगळवार, 27 जून रोजीही शहरात सामान्य पाऊस झाला आहे.
मुंबईत आज हवामान कसे असेल?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, राजधानी मुंबईत मंगळवारी म्हणजेचं आज 28 जून रोजी ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. यामुळे मुंबई शहरातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या आणि 30 तारखेला म्हणजेच पुढील दोन दिवस शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबईत 1 जुलै रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.
मुंबईत आज तापमान किती असेल?
मुंबईतील सांताक्रूझ येथे आज किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कुलाबा येथेही आज किमान तापमान 24 अंश तर कमाल तापमान 30 अंश राहण्याचा अंदाज आहे. बोरिवलीतही आज किमान तापमान 24 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.